घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेची खूषखबर; जिल्ह्यातील ४८४ विज्ञान शिक्षकांना पदोन्नती

जिल्हा परिषदेची खूषखबर; जिल्ह्यातील ४८४ विज्ञान शिक्षकांना पदोन्नती

Subscribe

प्राथमिक शिक्षण विभागाचा निर्णय, आठवड्यात या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांना शाळेवर नियुक्त केले जाणार

नाशिक परिषद प्रशासनाने आता जिल्ह्यातील ४८४ विज्ञान शिक्षकांना पदोन्नत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात एका दिवसात या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांना शाळेवर नियुक्त केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत समुदेशन प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील १,३८८ प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन करून २२ जून रोजी ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडली. विभागातील नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे हरकती घेतली आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने बदली प्रक्रियेविरोधात हरकत घेतली नसून, त्यांचा आक्षेप तांत्रिक बाबींवर आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते व प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. ऑनलाईन बदली प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता डी.एड. पात्रता धारक शिक्षकांनी 12 विज्ञान शाखेतून प्रवेश घेतलेला असेल, तर त्यांना विज्ञान शिक्षक म्हणून पदोन्नती दिली जाते. या शैक्षणिक वर्षात 484 शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार असून, पुढील दोन दिवसांत शिक्षकांची यादी तयार केली जाणार आहे. शिक्षकांना सोयीच्या ठरणार्‍या शाळेवर त्यांना नियुक्ती देण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षण विभाग करणार आहे.
दळण्याची वेळच येणार नाही

- Advertisement -

शालेय पोषण आहारात यापुढे तांदळाचे प्रमाण कमी करून बाजरी, गहु आणि ज्वारीच्या भाकरी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शिक्षकांनाच दळण दळण्याची कामे करावी लागतील, असा अंदाज वर्तवला जातो. या विरोधात शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असताना असा कोणताही शासनादेश अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे सांगत प्रशासनाने शिक्षकांचा दावा खोडून काढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -