घरक्राइमभांडण सोडवण्यास गेला अन् जीव गमावून बसला; सिडकोत तरुणाचा खून

भांडण सोडवण्यास गेला अन् जीव गमावून बसला; सिडकोत तरुणाचा खून

Subscribe

नाशिक : सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवर टोळक्याने गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच सिडको मधील सावता नगर परिसरात मंगळवारी (दि.२५) रात्री 9.30 वाजेदरम्यान पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. परशुराम बाळासाहेब नजान (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम नजान सावता नगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्यासोबत एक मित्र होता. दरम्यान, त्याच्या मित्राचे आणि संशयीतांचे जुने भांडण होते. जुन्या भांडणाची कुरापत काढून सुमारे तीन ते चार जणांनी परशुराम व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. परशुराम प्रतिकार करत असताना संशयतांनी हॉटेलच्या बाहेर पडलेल्या पेपर ब्लॉक त्याच्या डोक्यात घातला. त्यानंतर टोळके पळून गेले.

- Advertisement -

जखमी अवस्थेत मित्रांनी परशुरामला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारार्थ परशुरामला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक निरीक्षक किशोर कोल्हे, सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -