Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र MHADA Lottery 2023: म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? तर ही बातमी वाचाच

MHADA Lottery 2023: म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? तर ही बातमी वाचाच

Subscribe

अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये अनामत रक्कम, अल्प गटासाठी 50 हजार रुपये, मध्यम गटासाठी 1 लाख रुपये आणि उच्च गटासाठी दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली जाणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव लवकच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे

म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2023 च्या सोडतीसाठी अनामत रकमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण आता मात्र मंडळाने अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे.

त्यानुसार, अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये अनामत रक्कम, अल्प गटासाठी 50 हजार रुपये, मध्यम गटासाठी 1 लाख रुपये आणि उच्च गटासाठी दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली जाणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव लवकच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रकमेत वाढ केली आहे. अनामत रक्कम वाढल्याने या दोन्ही मंडळांच्या सोडतीला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ( MHADA Lottery 2023 The Board has proposed a substantial increase in the contribution amount for all income groups including the low group )

- Advertisement -

सर्व नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याचे म्हाडाचे उद्धिष्ट आहे. उत्पन्न गटांवर आधारित, राज्य सरकार लॉटरी प्रणाली आयोजित करते. हे गट EWS, LIG, MIG आणि HIG मध्ये विभागलेले आहेत.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी

म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. तर नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे.

- Advertisement -

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि अनावश्यक अर्ज फिल्टर करण्यासाठी बयाणा रक्कम अर्थात अनामत रक्कम वाढवण्याचा प्राधिकरणाचा विचार आहे. हे प्रकल्प खुल्या बाजारातील प्रकल्पांपेक्षा अधिक परवडणारे असल्याने अर्जदार अनेकदा त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने अनेक वेळा अरज करतात. त्यामुळे खऱ्या खरेदीदारांना संधी कमी मिळते. शिवाय, अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच, जेव्हा म्हाडाच्या फ्लॅटचे विजेते त्यांचे फ्ल‌ट जास्त नफ्यात विकतात, याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगण्यात येत आहे.

( हेही वाचा: अमित शाहांचा एकाच महिन्यात दुसरा महाराष्ट्र दौरा, मुख्यमंत्री स्वागताला जाणार )

म्हाडा 5 ते 10 टक्क्यांनी अनामत रक्कमेत वाढ करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावावर गृहनिर्माण प्राधिकरण चर्चा करुन तो मंजूर करण्याच्या तयारीत आहे. हा मसुदा एकदा अंतम झाल्यानंतर, मध्यम- उत्पन्न गट आणि उच्च- उत्पन्न गट युनिट्साठी टोकन मनी सुमारे 10 टक्के वाढवली जाणार आहे.

- Advertisment -