घरताज्या घडामोडीअमित शाहांचा एकाच महिन्यात दुसरा महाराष्ट्र दौरा, मुख्यमंत्री स्वागताला जाणार

अमित शाहांचा एकाच महिन्यात दुसरा महाराष्ट्र दौरा, मुख्यमंत्री स्वागताला जाणार

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय नागपूर दौरा आहे. एका महिन्यात अमित शाहांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्धाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. काल मंगळवारी पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

अमित शाह हे आज रात्री नागपूरमध्ये पोहोचणार आहे. पक्षीय बैठकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांची अमित शाह भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या स्वागताला नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

अमित शाह वर्धा रोडवरील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबणार आहेत. तर काल (मंगळवार) रात्रीपासूनच हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीडीडीएसकडून एनसीआय परिसरात तपासणी केली जात आहे. अमित शाहांसाठी स्पेशल बुलेटप्रूफ वाहनही नागपूरला आले आहे. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल केला जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Maharashtra Politics: 2024 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका? फडणवसींपेक्षा बावनकुळेंची भूमिका वेगळी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -