घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मध्ये सोसायटीच्या बंद गाळ्यात ठेवले मानवी अवयव

नाशिक मध्ये सोसायटीच्या बंद गाळ्यात ठेवले मानवी अवयव

Subscribe

भंगारात प्लॅस्टिकचे दोन डबे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याचे दिसून आले.

नाशिक : सोसायटीच्या गाळ्यांमध्ये १५ वर्षांपूर्वी ठेवलेले मानवी अवयव कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. किरण शिंदे यांनी सरावासाठी ठेवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डॉ. शिंदे यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. मात्र, मानवी अवयव कधी व कोणाकडून घेतले, याचा तपास पोलीस करत आहेत.मुंबई नाका पोलीस ठाण्यामागील बाजूस हरीविहार सोसायटीतील गाळ्यांमध्ये प्लॅस्टिक डब्यात मानवी अवयव सापडले. हे गाळे शुभांगिनी शिंदे यांच्या मालकीचे आहेत. त्यांची दोन मुले वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.

डॉ. किरण शिंदे यांनी अभ्यासासाठी मुंबईतील नानावटी कॉलेजमधून अवयव आणण्यात आले होते. केमिकल प्रक्रिया करुन डोके, हात व कान प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवण्यात आले होते. बंद असलेल्या गाळ्यातून दुर्गंधीयुक्त वास पसरल्याने नागरिकांनी रविवारी (दि.२७) रात्री पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस निरीक्षक दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, आनंदा वाघ, सुनील रोहकले यांच्यासह न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी आले.

- Advertisement -

सुरुवातीला गाळ्यात भंगार माल दिसला. भंगारात प्लॅस्टिकचे दोन डबे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याचे दिसून आले. डबे उघडताच दुर्गंधीचा लोट पसरला. पोलिसांनी बॅटरीच्या सहाय्याने पाहणी केली असता मानवी अवयव दिसून आले. ते फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यांच्यामार्फत मानवी अवयवांची चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. थोरात यांना पत्र दिले आहे. मानवी अवयव अभ्यासासाठी नोंदणीकृत महाविद्यालय किंवा रुग्णालयातच ठेवता येतात, असे डॉ. थोरात यांनी सांगितले.

गाळ्यांमध्ये वैद्यकीय अभ्यासाठी मानवी अवयव घटनास्थळी ठेवल्याचे समोर आले आहे. मानवी अवयव स्टडी पर्पजसाठी देण्याचे अधिकार सिव्हिल सर्जन यांना आहेत. त्याचे इन्चार्ज ते आहेत. मानवी अवयव कोठून आणि कोणी दिली, याबाबत चौकशी केली जाईल. मानवी अवयव देताना-घेतानाची नोंद करण्यात आली आहे की नाही, याची तपासणी केली जाईल.
– दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -