घरमहाराष्ट्रनाशिकआदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण स्थगित

आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण स्थगित

Subscribe

तहसीलदारांनी दिले चौकशीचे आश्वासन

 तालुक्यातील जानोरी येथील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने जानोरी येथे ग्रामसचिवालय कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. यावेळी दिवसभर आंदोलनकर्त्यांनी पावसात भिजून उपोषण केले. मात्र दिवसभर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. सायंकाळी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडावे अशी विनती केली व तहसिलदारांमार्फत उद्या बैठक घेऊन तोडगा काढू असे सांगितले. मात्र उपोषण करते आपल्या निर्णयावर ठाम होते.

बुधवार (दि. २२) रोजी दुसर्‍या दिवशी दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांच्या मध्यस्थीने आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. जानोरी येथील गट क्र. ११२४ मधील हद्दीबाबत असलेल्या तक्रारीची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने कालपासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार व गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत नंबर ११२४/१ व २ वादग्रस्त गटाची पाहणी करून जोपर्यंत या गटाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत तेथे सुरू असलेल्या कंपाऊंडच्या कामाला स्थगिती द्यावी तसेच संबंधित इसमाला याबाबत तात्काळ नोटीस द्यावी आणि गरज पडल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जानोरी ग्रामपंचायतचे प्रशासक अण्णा गोपाळ व ग्राम विकास अधिकारी के.के. पवार यांना देण्यात आले.

- Advertisement -

उपोषणकर्त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तो कायदेशीर निर्णय घेण्यात येईल. तसेच बुधवारी झालेल्या चर्चेचे इतिवृत्त तयार करून त्या इतिवृत्ताच्या माहितीची प्रत उपोषणकर्त्यांना देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार पंकज पवार यांनी दिले. सकारात्मक चर्चेनंतर तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सोडण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तलाठी किरण भोये उपस्थित होते. तहसीलदार यांनी उपोषणाची तात्काळ दखल घेऊन उपोषणस्थळी भेट देत प्रत्यक्ष पहाणी करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेवून सहकार्य केल्याबद्दल तहसीलदारांचे उपोषणकर्ते दत्तात्रय कोरडे, सोमनाथ वतार, रवींद्र बदादे, देवराम मोकाशी, ज्ञानेश्वर केंग, शंकर बेंडकुळे, गोरख जाधव, चंद्रकांत कडाळे, माधव मोरे, अंबादास फसाळे यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -