घरमहाराष्ट्रदाढी काढली तर अमोल कोल्हेला कोणी ओळखणार नाही; नितेश राणेंची जहरी टीका

दाढी काढली तर अमोल कोल्हेला कोणी ओळखणार नाही; नितेश राणेंची जहरी टीका

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे शिवसेनेसह विरोधी पक्षातील नेत्यांवर सातत्याने टीकास्त्र डागत असतात. अशाच वर्धा दौऱ्यावर असताना नितेश राणे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी विकासाच्या मुद्द्यावर का बोलत नाही? काँग्रेसचा एकही नेता विकासासंदर्भात बोलतो का? असे सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे.

खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत आमदार नितेश राणे यांनी अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. 2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू, इतकचं नाही तर, अमोल कोल्हे कुठेही भेटू दे त्याला दाखवतोच, अशा शब्दात नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नितेश राणे पुढे म्हणाले की, कुठला तो अमोल कोल्हे नावाचा अभिनेता, पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. त्याला 2024 मध्ये आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीकास्त्र डागत नितेश राणे म्हणाले की, भारत जोडो यात्रेमधील राहुल गांधी यांची कोणतेही पत्रकार परिषद बघा. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची. हिंदू धर्मावर टीका करायची. फक्त आमच्या साधू संतांवर टीका करायची. वीर सावरकरांवर टीका करायची. बाकी काहीच नाही, म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.


अरविंद केजरीवालांना राजकीय जाहिराती प्रसिद्ध करणं भोवलं; DIP ने पाठवली 164 कोटींची वसुली नोटीस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -