घरमहाराष्ट्रनाशिकझेडपीत खुर्चीचा खेळ; बांधकाम विभागात एकाच ठिकाणी दोन अधिकारी

झेडपीत खुर्चीचा खेळ; बांधकाम विभागात एकाच ठिकाणी दोन अधिकारी

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांच्या जागेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर शेवाळे हे बुधवारी (दि.19) जिल्हा परिषदेत हजर झाले. मात्र, नारखेडे यांची पदोन्नती झालेली असली तरी बदलीचे ठिकाण त्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी आता दोन अधिकारी काम कसे करणार, असा पेच निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे स्थगित असलेल्या प्रशासकीय बदल्या आता होत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील 44 आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांची एकाच दिवशी बदली झाली. यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने 12 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यकारी अभियंत्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांना अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली आहे. मात्र, त्यांना अद्याप बदलीचे ठिकाण मिळालेले नाही. त्यामुळे ते नियमितपणे जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळत आहेत. त्यांच्या जागेवर आलेले शेवाळे हे बुधवारी हजर झाले. मात्र, दिवाळीनंतर ते प्रत्यक्ष कारभार स्विकारण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -