घरमहाराष्ट्रनाशिकस्वच्छ भारताबरोबर आता शहरी राहणीमानाचेही सर्व्हेक्षण

स्वच्छ भारताबरोबर आता शहरी राहणीमानाचेही सर्व्हेक्षण

Subscribe

विविध योजनांच्या निधीसह देशभरातील गुंतवणुकदारांचा कल वळविण्यासाठी होणार फायदा; नाशिकसह ११४ शहरांनी घेतला सहभाग

स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या धर्तीवर केंद्र सरकारने शहरातील नागरिकांच्या रहाणीमानासंदर्भात सर्वेक्षण सुरु केले आहे. या सर्वेक्षणात देशातील ११४ शहरांनी सहभाग घेतला आहे. त्यात नाशिकचाही समावेश आहे. सर्वेक्षणात नाशिकचा अव्वल क्रमांक आल्यास त्याचा फायदा विविध योजनेंच्या निधीसाठी होणार आहे. शिवाय गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांचाही कल सर्वेक्षणाच्या निकालाच्या आधारे नाशिककडे वळू शकतो.
केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात ईज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक शहर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांकडून १ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान प्रश्नावली भरुन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये २४ प्रश्न विचारण्यात येत आहेत. हे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन राहणीमानासंदर्भात आहेत. त्यानुसार त्या शहरामधील नागरिकांची शहरामध्ये मिळणार्‍या सुविधांबाबतची मते समजणार आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार शहराचे आणि त्याचबरोबर शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सुविधांचे मुल्यांकन होणार आहे. हे मुल्यांकन केंद्रीय समितीमार्फत होणार आहे. शिक्षण, आरोग्य, निवारा, स्वच्छता, कचरा गोळा करणे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, रस्त्यावर पाणी तुंबणे, सुरक्षितता, दळणवळण, तत्काळ सुविधा, मनोरंजनाची साधने, कौशल्य विकास, आर्थिक व्यवहार, क्रीयशक्ती, वायू प्रदूषणण, हरित क्षेत्र, वीज आदी प्रकारे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्‍या क्षेत्रांशी निगडीत प्रश्न या प्रश्नावलीत विचारण्यात आले आहेत. त्यानुसार नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन शहराला या स्पर्धेमध्ये अव्वल आनण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोेरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी केले आहे.

या लिंकवर क्लिक करुन सर्वेक्षणात सहभाग नोंदवा:

हे सर्वेक्षण ऑनलाईन असून  https://eol2019.org/citizenfeedback या लिंकवर किंवा क्लिक करुन सर्वेक्षणात सहभाग नोंदविता येईल. हे सर्वेक्षण ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष प्रश्नावली भरुनही करण्यात येत आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात अर्ज उपलद्ब असतील.

- Advertisement -

https://eol2019.org/citizenfeedback

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -