घरमहाराष्ट्रनाशिककेंद्रिय युवक महोत्सवात ‘केटीएचएम’चा डंका

केंद्रिय युवक महोत्सवात ‘केटीएचएम’चा डंका

Subscribe

३७ महाविद्यालयांचा सहभाग

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात सर्वाधिक पारितोषिके पटकावत मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने चनरल चॅम्पियनशिप मिळवली. त्यानिमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

भारतीय जैन संघटनेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वाघोली (जि. पुणे) येथे दि. ६ डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. यात पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक या चार विभागातील एकूण ३७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. जिल्हास्तरीय स्वररंग स्पर्धेतील निवडलेल्या संघांना सादरीकरण करण्याची संधी मिळाली. मविप्र समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील एकूण ६५ विद्यार्थ्यांनी १३ कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला. यात ९ कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करून विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाची जनरल चॅम्पियनशीप पटकावली. केंद्रीय युवक महोत्सवात नाशिक विभागाला मिळालेली ही पहिलीच जनरल चॅम्पियनशीप आहे.

- Advertisement -

या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे यांनी केटीएचएमच्या संघाचे कौतुक केले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य पी. व्ही. रसाळ उपस्थित होते. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी डॉ. तुषार पाटील तसेच प्रा. वैशाली क्षीरसागर, प्रा. छाया लबडे, प्रा. प्रीतम नाकील, प्रा. तेजस बीलदिकर, प्रा. सूरज बोढाई यांनी संघ व्यवस्थापन केले. सर्वोत्कृष्ट सांघिक पारितोषिक व युवक महोत्सव सर्वसाधारण विजेते के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिकला मिळाले.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -