घरक्राइमबिबट्याचे शिकारी जाळ्यात; कातडीही जप्त

बिबट्याचे शिकारी जाळ्यात; कातडीही जप्त

Subscribe

नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या दुसर्‍या टोळीचा वनविभागाने अवघ्या १० दिवसांत पर्दाफाश केला असून, गुरुवारी (दि.१५) दोन तस्करांच्या मुसक्या आवळ्या आहेत. वन विभागाने पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर तस्कारांंनी विक्री आणलेली बिबट्याची कातडी जप्त केली आहे. ही कातडी किती दिवसांचा आहे, बिबट्याचे अवयव व हाडे कोठे आहेत, याचा वनविभागाकडून शोध घेतला जात आहे.

मोतीराम महादू खोसकर (३५, रा. आडगाव देवळा, ता.त्र् यंबकेश्वर), सुभाष रामदास गुम्बाडे(३५, रा. पाटे, ता. पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वनविभागाच्या माहितीनुसार, इगतपुरी-नाशिक- ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचला. पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर दोन संशयित बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन आले होते. पथकाने सापळा रचत दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी जप्त केली. शोध वनविभागाकडून त्यांच्या म्होरक्याचा सुरु आहे. तस्करांनी बिबट्यासह इतर कोणत्या वन्यप्राण्यांची तस्करी केली आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे. पुढील तपास ननाशी वनपरिक्षेत्र धिकारी सविता पाटील करीत आहेत.

असा होणार वन विभागाकडून तपास

  • अटकेतील तस्कर रेकॉर्डवरील आहे की नाही, त्यांनी बिबट्याला ठार करण्यापूर्वी वन्यप्राण्यांची तस्करी केली आहे की नाही.
  • वन्यप्राणी तस्करीमध्ये संघटित गुन्हेगारी असून, म्होरक्याचा शोध सुरु.
  • तस्करांनी बिबट्याला ठार केल्यानंतर त्यांची हाडे, मांस, दात्यांचे काय केले.
  • जप्त केलेली कातडी नर की मादीची आहे.
  • तस्कारांकडून वन्यप्राण्यांचे अवयव, कातडी कोणी घेतले आहे का.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -