थायलंडच्या सौंदर्य स्पर्धेच आमिष दाखवून मॉडेलची फसवणूक

नाशिक : बॅकॉक, थायलंड येथील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात मॉडेलिगची संधी देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकमधील एका भामट्याने नाशिकमधील मॉडेल्सची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अक्षय किर्ती जे रायचुरकर (रा.मुनिराबाद, कोप्पल, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

९ जुलै २०२२ ते १० जुलै २०२२ या कालावधीत इस्ट एव्हेन्यू, झारा हाईट्स, दुसरा मजला, वडाळा रोड, नाशिक येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित अक्षय रायचुरकर याने नाशिकमधील मॉडेलशी संपर्क साधला. मॉडेलिगचे फोटो त्याने मॉडेलला बॅकॉक, थायलंड येथे सप्टेंबर २०२२ मध्ये होणार्‍या मिस टुरिझम युनिव्हर्स २०२२ शो बाबत माहिती दिली. त्यानंतर त्याने मॉडेलचा विश्वास संपादन केला. या शोसाठी १ लाख ७० हजार रुपये लागणार असून, नाशिक ते बॅकॉकपर्यंत ये-जा करण्यासह सर्व सुविधा दिल्या जातील, असे त्याने मॉडेल्सला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत मॉडेलिंग करणार्‍या महिलेने २५ हजार रुपये दिले. त्यानंतर संशयिताने तिच्या पतीला ५५ हजार रुपये कर्नाटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुनिराबाद येथील शाखेतील बँक खात्यावर ट्रान्सफर करायला लावले. पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.