घरमहाराष्ट्रनाशिकधुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या अखेर जेरबंद

धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या अखेर जेरबंद

Subscribe

भुसे, म्हाळसाकोरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून कायम होती दहशत

निफाड : भुसे, म्हाळसाकोरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या परिसरातील वासरे, अनेक कुत्री फस्त केली होती. यामुळे शेतात राहणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. यामुळे नागरिकांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती.

चार दिवसांपूर्वी वनविभागाने भुसे येथील ज्ञानेश्वर आघाव यांच्या शेतात नर जातीचा बिबट्या जेरबंद केला होता. परिसरात आणखी एक बिबट्या असल्याचा अंदाज शेतकर्‍यांना होता. त्यामुळे वनविभागाने त्याच दिवशी पुन्हा पिंजरा लावला तर ३० तारखेला पुन्हा रात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात मादी जातीचा ३-४ वर्षे वयाचा बिबट्या पिंजर्‍यात अडकला. चार दिवसात एकाच शेतात दोन बिबट्ये जेरबंद झाल्याने शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला तर शेतकर्‍यांनी परिसरात पाहिलेले दोन्हीही बिबटे वनविभागाने जेरबंद केल्याने वनविभाचे व भैय्या शेख व वनमजुरांचे आभार मानले. भुसे येथील ज्ञानेश्वर आघाव यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करत त्याला ठार केले होते. त्यानंतर लगेचच ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -