घरमहाराष्ट्रनाशिक"सावाना" निवडणुकीत ग्रंथालय भूषणचा दबदबा

“सावाना” निवडणुकीत ग्रंथालय भूषणचा दबदबा

Subscribe

अध्यक्ष पदी प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे आणि वैद्य विक्रांत जाधव यांची निवड

नाशिक : ‘सावाना’च्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारल्यानंतर दुसर्‍या दिवशी या पॅनलच्या उमेदवारांनीही विजयाची घोडदौड कायम राखली. मंगळवारी (दि.१०) कार्यकारिणी मंडळांच्या १५ सदस्यांच्या निवडीसाठी रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. तिसर्‍या फेरीअखेर ग्रंथालय भूषणचे अनेक उमेदवार आघाडीवर होते. तर, ग्रंथमित्र पॅनलचे अवघे मोजके उमेदवार विजयानजीक असल्याचे दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीत ग्रंथालय भूषण विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

सावानाच्या १८ जणांच्या कार्यकारिणीसाठी २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. ८) मतदान झाले. दोन पॅनलसह ४८ उमेदवार रिंगणात होते. ३,९०५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (दि. ९) सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी मतमोजणीच्या फक्त दोनच फेर्‍या झाल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलने अध्यक्ष, उपाध्यक्षपद ही मुख्य पदे पटकावली.

- Advertisement -

अध्यक्ष पदी प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे आणि वैद्य विक्रांत जाधव यांची निवड झाली. या तिघांना सभासदांनी निसटता कौल दिला. त्यांना ग्रंथमित्र पॅनलच्या उमेदवारांनी चुरशीची लढत दिली. दरम्यान, सावाना तंटामुक्त करण्यासह विकासासाठी विविध उपाययोजना राबवणार असल्याचे अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांनी सांगितल्याने निवडणूक रंगतदार झाली.

मंगळवारी (दि.१०) सकाळी १० वाजेपासून कार्यकारिणीच्या सदस्यपदासाठी मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला बाद मते काढण्यात आली. दोन्ही पॅनलकडून बाद मते मोजण्यात आली. त्यानंतर गठ्ठे तयार करण्यात आले. मतमोजणीच्या १० टेबलवर दिवसभरात तीन फेर्‍या झाल्या. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -