घरमहाराष्ट्रनाशिकनगरमध्ये विखे, जगताप यांच्यात प्रमुख लढत

नगरमध्ये विखे, जगताप यांच्यात प्रमुख लढत

Subscribe

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २२ अर्ज दाखल

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रमुख लढत होणार आहे. आता सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले आहे.

डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करत नगरमधून उमेदवारी मिळवली. दुसरीकडे राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. जगताप हे राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. मात्र कर्डीले यांनी आपण पक्षाचाच प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नगरमध्ये विखे विरूद्ध जगताप अशी मुख्य लढत पहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी धनश्री विखे (भारतीय जनता पार्टी), संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ), धीरज बताडे (राईट टू रिकॉल पार्टी), नामदेव वाकळे यांनी (2 अर्ज)(बहुजन समाज पार्टी), सुनिल उदमले (अपक्ष), शेख रियाजुद्दिन दादामिया (अपक्ष), कमल सावंत (अपक्ष), रामनाथ गोल्हार (अपक्ष),आप्पासाहेब पालवे (अपक्ष), भास्कर पाटोळे (अपक्ष), श्रीधर दरेकर (अपक्ष), सबाजीराव गायकवाड (अपक्ष), रामकिसन ढोकणे (अपक्ष), शेख आबीद मोहम्मद हनीफ (अपक्ष), भागवत गायकवाड (अपक्ष), शेख फारूख इस्माईल (भारतीय प्रजा सुराज्य), सुदर्शन शितोळे (हिंदु एकता आंदोलन पार्टी), विलास सावजी लाकुडझोडे (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष), शेख जाकीर रतन (भारतीय अल्पसंख्यांक पार्टी), पोपट दरेकर यांनी क्रांतीकारी जयहिंद सेनेकडून अर्ज दाखल केले आहेत. माघारीसाठी ८ एप्रिलपर्यत मुदत आहे.

- Advertisement -

धनश्री विखे यांच्या अर्जामुळे चर्चा

डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने २ वाजून ५५ मिनिटांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे पती डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल आहेत. धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुजय विखे यांच्या अर्जास अडचण आल्यास पर्याय म्हणून धनश्री विखे यांनी अर्ज भरल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -