घरमहाराष्ट्रनाशिकगोडसेंसाठी भुजबळांकडून शिवसेना मॅनेज : कोकाटे

गोडसेंसाठी भुजबळांकडून शिवसेना मॅनेज : कोकाटे

Subscribe

जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभाग आयोजित राजकीय जनजागृती कार्यक्रमात कोकाटे यांनी भूमिका मांडली

गोखले एज्युकेशन संस्थेच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्यावतीने आयोजित राजकीय जनजागृती कार्यक्रमात कोकाटे यांनी भूमिका मांडली. आता आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगत पक्षाशिवायही विकास करता येतो, अपक्षाला सरकारकडे लोकांचे प्रश्न मांडता येतात. राजकीय पक्षाच्या खासदारांना मर्यादा येतात, असेही त्यांनी सांगितले.

भुजबळांशी कधीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यांना मदत होईल, अशी भूमिका घेणार नाही. भुजबळ हेच आपले खरे विरोधक आहेत. विकासाच्या गोंडस नावाखाली गोडसे आणि भुजबळ यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे. विकास करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे, असे नमूद करताना त्यांनी सिन्नरचे बसस्थानक, पाणीपुरवठा योजना आणि स्वतः केलेल्या कामाची उदाहरणे दिली. चार दिवसांच्या राजकीय जनजागृती कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आणि डॉ. मेधा सायखेडकर यांनी चार दिवसांतील कार्यक्रमाचा गोषवारा मांडला. उपप्राचार्या डॉ. वृंदा भार्गवे यांनी समारोप करून आभार मानले.

- Advertisement -

बहुजन वंचित आघाडी

बहुजन वंचित आघाडीला महाराष्ट्रातील राजकारण बदलायचे असल्याचे आघाडीचे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक वामनराव गायकवाड यांनी सांगितले. दिंडोरी मतदारसंघातील डॉ. भारती पवार आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण आघाडीच्या संपर्कात होते, असा दावा त्यांनी केला. प्रस्थापितांना उमेदवारी द्यायची नाही, हे आघाडीचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -