घरमहाराष्ट्रनाशिकगणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करा

गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करा

Subscribe

आयुक्तां़कडून गुणवत्तापूर्ण काम करण्याची ताकीद

नाशिक : शहरातील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसह गणेश मंडळ पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. महापालिकेविषयी प्रचंड संताप व्यक्त होत असताना आता खुद्द आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेत शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कंत्राटदारांची बैठक घेतली. यात गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवावेत, शिवाय खड्डे बुजवण्याच्या कामात कसूर नको आणि गुणवत्तेत तडजोड नको, असे स्पष्ट निर्देश दिले.

कामाचा दर्जा नसेल आणि पावसाळ्यापूर्वी वेळेत कामे केली नाहीत, तर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी बैठकीत दिला. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू आहे. सहा विभागांत बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जाते आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी डांबर आणि खडीचा वापर सुरू आहे. सोमवारी (दि. २२) पंचवटी भागात रासबिहारी स्कूल रोडवर इमल्शनचा वापर करुन खड्डे बुजवण्यात आले. नाशिकरोड विभागात जेलरोडला जीएसबी मटेरीअलचा वापर करुन खड्डे बुजवण्यात आले. याच विभागात लॅमरोडलाही जीएसबी मटेरीअलचा वापर करुन खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर त्यावर रोलींगही करण्यात आले आहे. पेठरोड येथेही खड्डे बुजवण्यात आले. प्रभाग क्रमांक ६ मध्ये शरद पिंगळे नगरात वेट मिक्स मटेरीअल कच्च्या रस्त्यावर पसरवण्यात आली. म्हसरुळ-आडगाव रोडवरही खड्डे बुजवण्यात आले. कामटवाडे गाव, कैलास नगर, प्रभाग क्रमांक 2 मध्येही खड्डे बुजवण्यात आले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -