घरमहाराष्ट्रनाशिकसिन्नर-घोटी अंतर होणार कमी

सिन्नर-घोटी अंतर होणार कमी

Subscribe

पाडळी देशमुख रेल्वे पुलाचे रुंदीकरण सुरू

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गानजीक असलेल्या पाडळी देशमुख गावाकडे जाणार्‍या रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन इगतपुरीचे मठाधिपती माधव महाराज घुले व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले.
माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, वाडीवर्हेचे ग्रामपंचायत सदस्य गोविंद डगळे, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष रामदास धांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पाडळी देशमुख गावाकडे, तसेच सिन्नर-घोटी राज्यमार्गाकडे जाण्यासाठी रेल्वेच्या अरुंद पुलामुळे मोठा वळसा घ्यावा लागत होता. या पुलाची रुंदी वाढवावी यासाठी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी खासदार गोडसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. खासदार गोडसे यांनी पूलाची गरज लक्षात घेऊन रेल्वे अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. त्याची दखल घेत या कामाला मंजुरी मिळाली. रेल्वे विभागाने या कामाला प्रत्यक्ष सुरवात केली.

- Advertisement -

कार्यक्रमास भाजपचे भाऊसाहेब कडभाने, देविदास जाधव, विष्णु धोंगडे, घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, मुकणेचे सरपंच हिरामण राव, जानोरीचे सरपंच अर्जुन भोर, अशोक महाराज धांडे, किरण धांडे, मनोहर जाधव, रुंजा धोंगडे, साहेबराव धोंगडे, दिलीप मुसळे, रवींद्र घाटेसाव, रतन धांडे, फकिरराव धांडे, दिनेश धोंगडे, शिवाजी जाधव, संजय धोंगडे, तानाजी धांडे, बजरंग वारुंगसे, अरुण भोर, सजन नाठे, सोमनाथ चारस्कर, बापु वारघडे, रामदास वारुंगसे, भानुदास धांडे, लखन धांडे, अंबादास धोंगडे, सुरेश ढगे, गणेश धांडे, सूरज ढगे, माधव नाठे, सोहम धांडे, रेल्वे खात्याचे वरीष्ठ अधिकारी एन. बी. नवसारे, मोहन बोरसे, रामदास शिंदे, सुभाषचंद्र शर्मा उपस्थित होते. प्रास्ताविक रेल्वेचे एन. बी. नवसारे यांनी, तर सूत्रसंचालन प्रल्हाद धांडे यांनी केले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -