घरताज्या घडामोडीसंयुक्त किसान मोर्चा ३१ जानेवारीला साजरा करणार 'विश्वासघात दिवस'; जिल्हास्तरावर होणार आंदोलन

संयुक्त किसान मोर्चा ३१ जानेवारीला साजरा करणार ‘विश्वासघात दिवस’; जिल्हास्तरावर होणार आंदोलन

Subscribe

१५ जानेवारीला झालेल्या आढावा बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चाने ३१ जानेवारीला विश्वासघात दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

देशभरात ३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) केली. यामध्ये जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहेत. समन्वय समितीच्या बैठकीनंतर शेतकरी संघटनेच्या एसकेएमने सांगितले की, ‘आंदोलनाशी जोडलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी हा विरोध मोठ्या उत्साहात करा. देशातील कमीत कमी ५०० जिल्ह्यात हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी आशा आहे.’ ३१ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारला निवेदनही देण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

दरम्यान १५ जानेवारीला झालेल्या आढावा बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चाने ३१ जानेवारीला विश्वासघात दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, सरकारने त्यांना धोका दिला आहे. तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एक वर्षांपेक्षा अधिक काळ आंदोलन केले होते. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने घोषणा केली, जर सरकार त्यांच्या इतर मागण्या पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू होऊ शकते.

- Advertisement -

१५ जानेवारीच्या एसकेएमच्या बैठकीनंतर सरकारने ९ डिसेंबर २०२१च्या कागदपत्रात केलेले आश्वासन पूर्ण केले नाही, यावरून सरकारची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे. एसकेएमने म्हटले की, गेल्या दोन आठवड्यात आंदोलकर्त्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याबाबत किंवा शहीदांच्या कुटुंबियांसाठीच्या नुकसान भरपाईबाबत कोणतीही हालचाल केली नाही. तसेच सरकारने एमएसपीच्या मुद्द्यावर समिती स्थापना करण्याची घोषणा देखील केली नाही. त्यामुळे देशभरात शेतकऱ्यांनी विश्वासघात दिनाच्या माध्यमातून सरकार विरोधातील संताप व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा – आंदोलक तरुणांच्या समर्थनार्थ राहुल गांधी म्हणतात; “कोण म्हणतं हे अच्छे दिन आहेत”

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -