घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेची करवसुली मोहीम; पाऊणेतीन कोटींची वसूल

महापालिकेची करवसुली मोहीम; पाऊणेतीन कोटींची वसूल

Subscribe

नाशिक : घरपट्टीची थकबाकी साडेतीनशे कोटीच्या घरात गेली असताना व कर्मचार्‍यांना वसुलीत येणार्‍या अडचणी लक्षात घेत महापालिकेने एक हजार २९८ कोटी बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर वसुलीसाठी तिसर्‍या दिवशी बुधवारी (दि.१९) ढोल वाजविण्यात आले. बदनामीच्या भीतीने तिसर्‍या दिवशी थकबाकीदारांकडून सुमारी ९१ लाख ६ हजार ३८० रुपयांची वसुली करण्यात आली. तीन दिवसांत एकूण पावणेतीन कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.

नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 ऑक्टोबरपासून एक लाखांच्या पुढे असलेले थकबाकीदार यांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सहा विभागात १०९ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले. नाशिक पश्चिममध्ये ३७, नाशिक पूर्व २४, नवीन नाशिक ९, पंचवटी १४, नाशिकरोड ११, सातपूरमध्ये १४ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले. नाशिक पश्चिम विभागात सर्वाधिक 27 लाख 28 हजारांची वसुली झाली. त्यानंतर पंचवटी विभागात 14 लाख 18 हजार 745 रुपये वसुली झाली.

- Advertisement -
विभागनिहाय वसूली

नाशिक पूर्व 8,47,960 रुपये
नाशिक पश्चिम 27,28,000 रुपये
पंचवटी 14,18,745रुपये
नाशिक रोड 4,74,752 रुपये
नवीन नाशिक 18,06,233 रुपये
सातपूर 18,03,743 रुपये
एकूण 91 लाख 6 हजार 380 रुपये

१२५८ थकबाकीदार

एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एक हजार २५८ थबबाकीदार आहेत. त्यांची नावे नाशिक महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सुटीचे दिवस वगळता एकूण 19 दिवस ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती कर विभागाने दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरावी तसेच चालू वर्षीचा कर भरुन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल पथक ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार असल्याची माहिती कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -