घरमहाराष्ट्रनाशिकलोहणेर जळीतकांड: प्रेयसीसह दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा

लोहणेर जळीतकांड: प्रेयसीसह दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा

Subscribe

जळीतकांड: लोहणेर येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

देवळा : आईवडिलांनी निश्चित केलेले लग्न मोडल्याचा रागातून प्रियकराला जाळून मारल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या दोघा भावांसह नातेवाईकांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरल्याने, युवकाचा रविवारी (दि.१३) रात्री मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद लोहणेर गावात दिसून आले. हे गाव सोमवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (दि.११) भरदिवसा प्रेयसी संशयित प्रेस प्रेयसी कल्याणी तिचे वडील गोकुळ सोनवणे आणि तिच्या दोन भावांसह नातेवाईकांवर खुनाच्या वाडीव कलम लावण्यात आले आहे.

देवळा तालुक्यातील लोहणेर येथील गोरख आणि कल्याणी सोनवणे यांचे प्रेमसंबंध होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र, या लग्नाला कल्याणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. कल्याणीला पाहुणे पाहण्यास आले होते. मात्र, तिच्या प्रेम संबंधाबाबत माहिती मिळाल्याने पावले निघून गेले. याबाबत जाब विचारण्यात आलेल्या संशयितांनी गोरखला शुक्रवारी (दि.११) मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी गोरख एका मोबाईल दुकानात घुसला. मात्र, संशयितांनी लोखंडी गजाने गोरखच्या डोक्यावर वार केले. गोरख रस्त्यावर पडलेला असतानाच त्याची प्रेयसी कल्याणीने दुचाकीमधून पेट्रोल काढून गोरखच्या अंगावर टाकले व पेटवून दिले. यात गोरख गंभीर भाजला होता. नाशिकच्या सिव्हीलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.

- Advertisement -

चौघा संशयितांना अटक

पोलिसांनी कल्याणी गोकूळ सोनवणे, गोकुळ तोगल सोनवणे, निर्मला सोनवणे, हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशीच पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले होते. गोरखच्या मृत्यूनंतर कलमांत वाढ करण्यात आली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -