बग शोधल्याने भारतीयाला गुगलचे ६५ कोटींचे बक्षीस, वर्षभरात Google च्या २३२ vulnerability केल्या रिपोर्ट

google

जगातील सर्वात लोकप्रिय अशा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सुरक्षिततेच्या त्रुटी असल्याचे एका भारतीयाने गुगलच्या निदर्शनास आणून दिले. गुगलसारख्या टेक्नोलॉजी जायंटला मदत केल्यासाठी गुगलने या भारतीयाला बक्षीसाछी मोठी रक्कम देत गौरवलेही आहे. गुगलमधील त्रुटी शोधण्यासाठी अमन पांडे या भारतीयाला गुगलने ६५.७९ कोटी रूपये बक्षीस म्हणून दिले आहेत. वर्ष २०२१ मध्ये गुगलने संशोधकांसाठी ८७ लाख डॉलर म्हणजे ६५.७९ कोटी रूपये हे vulnerability रिवॉर्डच्या रूपात दिले. गूगलमध्ये बग्स शोधण्यासाठी गुगलने ही रक्कम देऊ केली आहे. अमन पांडे bugsmirror चा सीईओ असून सर्वाधिक रिवॉर्ड मिळवणारा भारतीय ठरला आहे. (google vulnerability report reward for Indore techie for submitting maximum bugs in android system )

गुगलने २२० यूनीक रिपोर्ट्ससाठी २.९६ लाख डॉलर्सची रक्कम ही बक्षीस स्वरूपात दिली आहे. तीन जणांना गुगलने सर्वाधिक अशी बक्षीसाची रक्कम देऊ केली आहे. त्यामध्ये अमन पांडे, Yu cheng Lin तसेच [email protected] अशी प्रोफाईल असणाऱ्या संशोधकाचा समावेश आहे. या तिघांनी सर्वाधिक असा रिवॉर्ड स्कोअर मिळवला आहे. या लोकांना सर्वाधिक अशी बक्षीसाची रक्कम मिळाली आहे.

गुगलने प्रकाशित केलेल्या अहवालात अमन पांडेचे नाव नमुद केले आहे. bugsmirror टीमच्या अमन पांडेने २०२१ वर्षामध्ये संशोधनात सर्वाधिक अशा २३२ vulnerability रिपोर्ट केल्या आहे. जगभरातून सर्वाधिक अशा गुगल बग्स सबमिट करणारा भारतीय ठरला आहे. याआधी अमनने आपला अहवाल २०१९ मध्ये दाखल केला होता. त्यामध्ये सर्वाधिक २८० मान्यता मिळालेल्या vulnerability रिपोर्ट केल्या आहेत.

कोण आहे अमन पांडे ?

अमन पांडेने NIT भोपाल येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे. २०२१ मध्ये त्याने आपली स्वतःची कंपनी रजिस्टर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून google, apple सारख्या दुसऱ्या कंपन्यांची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचे काम करण्यात येते. गुगलने याआधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात म्हणजे दुप्पट अशी बक्षीसाची रक्कम देऊ केली आहे. आतापर्यंत एंड्रॉईड VRP अंतर्गत देण्यात आलेली ही सर्वाधिक अशी रक्कम आहे. आता गुगलने Android Chipset Security Reward Program (ACSRP) ची सुरूवातही केली आहे. हा प्रोग्राम गुगलने चीपसेट मॅन्यूफॅक्चरर्ससोबत मिळून सुरू केला आहे. त्यामध्ये २०२१ मध्ये व्हॅलिड, युनिक सिक्युरीटी रिपोर्टसाठी 2.96 लाख डॉलर्स ही रक्कम ACSRP अंतर्गत देण्यात येणार आहे. गुगल क्रोममध्येही अनेक मोठ्या प्रमाणात बग स्पॉट करण्यात आले आहेत. वर्ष २०२१ मध्ये गूगलने ३३ लाख डॉलर्सचे बक्षीस दिले आहे.