घरमहाराष्ट्रनाशिकदिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व, शिवसेना दोन नंबरवर

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व, शिवसेना दोन नंबरवर

Subscribe

दिंडोरी : तालुक्यातील काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आज तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठ्या वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तारुढ भगवती पॅनलने बाजी मारत सरपंचपदाच्या नऊ जागांवर विजय मिळवला आहे तर विरोधी जगदंबा पॅनलला पाच तर परिवर्तन पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भरसट विजयी झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या संपन्न जानोरी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी पॅनल प्रणित जनसेवा पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले असून सरपंचपदासह 15 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी परिवर्तन पॅनलला 2 व आपल्या पॅनलला एक जागा राखण्यात यश आले. सरपंचपदी सुभाष संतोष नेहरे विजयी झाले असून माजी उपसरपंच गणेश तिडके सलग दुसर्‍यांदा विजयी झाले आहे.

मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्रांती पॅनलचे सरपंचपदासह अकरा सदस्य निवडून आले आहे तर सरपंचपदी आशा लक्ष्मण लहांगे विजयी झाल्या आहेत. एका जागेवर दोन उमेदवारांना सारखे मतदान झाल्याने एका सदस्याची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. वरखेडा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उपाडे यांच्या पॅनलची सत्ता आली असून सरपंचपदी केशव वाघले हे विजयी झाले आहे. तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असून दहापैकी आठ जागांवर त्यांच्या गटाने विजय मिळवला असून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे व गोकुळ चौधरी यांच्या पॅनलचे दोन जागा निवडून आल्या आहेत. जवळके दिंडोरी येथे सरपंचपदी भारती तुकाराम जोंधळे विजयी झाल्याने सत्तारूढ गटाने पुन्हा सत्ता राखली आहे. विरोधी गटाच्या पाच जागा निवडून आल्या आहेत. अनेक ग्रामपंचायती धक्कादायक निकाल लागले असून अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना दणका दिला आहे. 50 ग्रामपंचायतीच्या सत्तेवरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी दावे-प्रतिदावे केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -