घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

Subscribe

दुसर्‍या क्रमांकावर भाजप, शिवसेनेची पिच्छेहाट, स्वराज्य संघटनेचे खाते उघडले

नाशिक :  जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या १९६ ग्रामपंचायतींच्या निकालात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ठिकाणी काबिज करत एक नंबर पटकावला आहे. त्यापाठोपाठ भाजपने सत्ता मिळवली आहे. तर अंतर्गत राजकारणाचा शिवसेनेला फटका बसल्यामुळे ठाकरे व शिंदे गटाची पिच्छेहाट झाली. काँग्रेस पक्षानेही समाधानकारक यश मिळवत आपले स्थान कायम ठेवले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या स्वराज्य संघटनेने नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी विजय मिळवत खाते उघडले आहे.

शिंदें गटाचे आमदार, खासदार पालकमंत्री असतांनाही नांदगाव, मालेगाव व्यतिरिक्त पक्षाची फारशी ताकद दिसली नाही. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. देवळा, चांदवडमध्ये भाजप तर बागलाण कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात १५ पैकी १३ जागावर शिंदे गटाचा भगवा फडकविला आहे. आमदार राहुल आहेर यांच्यां चांदवड तालुक्यात भाजपला १४ जागा मिळाल्या. देवळा तालुक्यात भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी आपला गड राखला. १३ पैकी ११ जागांवर भाजपने बाजी मारली. दादा भुसे यांच्या मालेगावमध्ये शिंदे गटाला ६ तर भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत.

- Advertisement -

१० टक्के अपक्षांना पसंती

१९६ जागांपैकी २० जागी अपक्ष सरपंच निवडून आले असून त्यामुळे एकुण १० ठिकाणी अपक्षांच्या हाती झेंडा आल्याचे चित्र आहे. दरम्यान, ज्या भागात ज्या पक्षाचे सदस्य अधिक, त्यांच्याकडून ग्रामपंचायत सरपंचाला आपल्या गटात खेचण्यासाठी कसरत सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा निकाल

    पक्ष      जागा

  • राष्ट्रवादी – ६३
  • भाजप – ५५
  • ठाकरे गट (शिवसेना) – २८
  • शिंदे गट (शिवसेना) – २२
  • काँग्रेस – ७
  • माकप – १
  • स्वराज्य संघटना – ३
  • अपक्ष व इतर – १७

तालुकानिहाय गाव आणि सरपंच 

         चांदवड (३५ )

      गाव       सरपंच

  • आडगाव – लताबाई घुले (भाजप)
  • बोराळे – बाकेराव जाधव (राष्ट्रवादी)
  • भाटगाव – हिराबाई पगार (भाजप)
  • भुत्याणे – बाबुराव चिंचोले (राष्ट्रवादी)
  • चिंचोले – पवन जाधव (भाजप)
  • दहेगाव मं. – कमळाबाई पगारे
  • चिखलअंबे – शोभा लांडगे (राष्ट्रवादी)
  • दरेगाव – सरला पवार (ठाकरे गट)
  • देवरगाव – ज्ञानेश्वर शिंदे (भाजप)
  • दुधखेड – उषा पगार (काँग्रेस)
  • दुगाव – संजय सोनवणे (काँग्रेस)
  • डोनगाव – गोकुळ वाघ (काँग्रेस)
  • गणुर – बाळू सोनवणे (काँग्रेस)
  • कोकणखेडे – विठ्ठल शिंदे (भाजप)
  • कुंदलगाव – कविता मोरे (काँग्रेस)
  • काजीसांगवी – कल्पना ठाकरे (काँग्रेस)
  • खेलदरी- मालती जाधव (भाजप)
  • खडक ओझर – सागर पगार (राष्ट्रवादी)
  • मालसाणे – पुष्पा बोरगुडे (राष्ट्रवादी)
  • मेसनखेडे खु. – संतोष माळी
  • निंबाळे –  रविना सोनवणे (भाजप)
  • निमोण – स्वाती देवरे (भाजप)
  • पाटे-कोलटेक – रंगनाथ सूर्यवंशी (महावि आघाडी)
  • पुरी – रंजना पानसरे (राष्ट्रवादी)
  • रेडगाव खु – यादव गरुड (भाजप)
  • साळसाणे – अनिल ठाकरे (काँग्रेस)
  • सोनीसांगवी – प्रवीण ठाकरे (ठाकरे गट)
  • शेलू – अमोल जाधव (भाजप)
  • शिंगवे – आत्मराव खताळ (भाजप)
  • तळेगाव रोही – भाऊसाहेब जिरे (राष्ट्रवादी)
  • तळवाडे – संदीप जाधव
  • वाद – प्रवीण आहेर (भाजप)
  • वडाळीभोई –  नितीन आहेर (ठाकरे गट)
  • विटावे – साईनाथ कोल्हे (भाजप)

      बागलाण  (४१)

  • मुंजवाड – जयश्री जगताप
  • माळीवाडे – केशव गवळी
  • चौधाणे – विमल मोरे
  • चौगाव – सुलकणबाई पवार
  • डांगसौंदाने – सिंधुबाई निकम
  • तिळवण – विमल बोरसे
  • आराई – दिलीप सोनवणे
  • आसखेडा – दीपक कापडणीस
  • वनोली – शरद भामरे
  • गोळवाड – गंगूबाई आहिरे
  • टेंभे खालचे – बेबीबाई चव्हाण
  • कातरवेल – सुवर्णा चव्हाण
  • मुंगसे – भगवान पिंपळसे
  • वटार – मच्छिंद्र खैरनार
  • तांदुळवाडी – आशाबाई भामरे
  • मुल्हेर – निंबा भामरे
  • मोरेनगर – वैशाली देवरे
  • मळगाव बु – योगेश ठोके
  • डोंगरेज – बापू खैरनार
  • खिरमाणी – बाबाजी भदाणे
  • निकवेल – दीपक मोरे
  • औंदाणे – भरत पवार
  • आनंदपुर – रोहिणी पवार
  • वाघांबे – सुशीला सूर्यवंशी
  • गोराणे – डॉ.दिनेश देसले
  • तळवाडे भामेर – दिनेश गायकवाड
  • देवठाण दि – सोनी ठाकरे
  • टेंभे वरचे – किरण वाघ
  • मानूर – पंडित मोरे
  • जाखोड – शंकर पवार

         येवला (७)

  • कोटमगाव बु – राजेंद्र काकळीज (स्वराज्य संघटना)
  • कुसुर – सुरेखा गायकवाड (राष्ट्रवादी)
  • एरंडगाव – खुर्द योगिता खापरे (राष्ट्रवादी)
  • चांदगाव – पवन साळवे (ठाकरे गट)
  • नांदेसर – सुनिता जाधव (भाजप)
  • आडगाव – चोथवा रामकृष्ण खोकले
  • नायगव्हाण – सुनिल साळवे (ठाकरे गट)

          इगतपुरी (२)

  • मुंढेगाव – मंगला गतीर
  • वासाळी – सुनिता कोरडे

       नांदगाव (१५)

  • शास्त्रीनगर –
  • पिंपरखेड – जीवन गरुड
  • धनेर – मनीषा वाघ
  • मुळडोंगरी – जन्याबाई पवार
  • लोढरे – ज्योती निकम
  • नागापूर – राजेंद्र पवार
  • लक्ष्मीनगर – मीराबाई उगले
  • बोयगाव – बबन शेरमाळे
  • भार्डी – अनिता मार्कंड
  • हिरेनगर – मंगला बिन्नर
  • कसाबखेडा –
  • हिसवळ बु शांताराम पवार
  • तळवाडे शीतल निकम
  • नवसारी –
  • धोटाणे खु. – शरद काळे

         कळवण (१६)

  • कोसुर्डे – सविता बागुल
  • पिळकोस – उज्वला पवार
  • देसराणे – भगवान वाघ
  • मानुर – वैशाली चव्हाण
  • जयपूर –
  • भादवण – रेशमाबाई पवार
  • पाळे खुर्द – अंजना पवार
  • वाडी बु. – दुर्गा पवार
  • बगडु –
  • गोळाखाल – प्रभाकर गायकवाड
  • कुंडाणे ओ – संगीता जाधव
  • जयदर – देविदास भोये
  • निवाणे – जयश्री आहेर
  • शिरसमणी – उखा गांगुर्डे
  • कळवण खु. – लक्ष्मण पवार
  • सुळे – भारती चव्हाण

         निफाड (२०)

  • दिक्षी – योगेश्वर चौधरी
  • खडक माळेगाव – जगदीश पवार (राष्ट्रवादी)
  • नांदुर्डी – जयश्री जाधव (राष्ट्रवादी)
  • निमगाव वाकडा – पूजा दरेकर (राष्ट्रवादी)
  • पिंपळगाव बसवंत – भास्कर बनकर (ठाकरे सेना)
  • कोटमगाव – आरती कडाळे (ठाकरे सेना)
  • थेटाळे – शीतल शिंदे (राष्ट्रवादी)
  • लोणवाडी – पल्लवी साळवे
  • तारुखेडले – बिनविरोध
  • बोकडदरे – विजय सानप (शिंदे गट)
  • कसबेसुकेणे – आनंद भंडारे
  • खानगाव थडी – बिनविरोध
  • कोकणगाव – सुरेखा मोरे
  • मांजरगाव – वंदना सोनवणे
  • पिंपळस – निशा ताजणे
  • साकोरे मिग – शोभा बोरस्ते
  • शिंगवे – सुशिला पवार (ठाकरे गट)
  • सोनेवाडी खु. – लता आव्हाड
  • धारणगाव वीर – दीपक सोनवणे (अपक्ष)
  • चांदोरी,नागापूर – विनायक खरात

        मालेगाव (13)

  • माल्हणगाव – बाबाजी सूर्यवंशी
  • शिरसोंडी – सोनाली पवार
  • वजिरखेडे – सुनिता बोरसे
  • दाभाडी – प्रमोद निकम
  • टोकडे – कैलास दाभाडे
  • रोझे – सुमन गायकवाड
  • जाटपाडे – भागचंद तेजा
  • सौंदाणे – शितल पवार
  • निंबायती – ताईबाई माळी
  • पाटणे – संगिता यशोद
  • करंजगव्हाण – कविता सोनवणे
  • मोहपाडे – भगवान बोरकर
  • चौकटपाडे – निर्मला पवार

       देवळा (१३)

  • दहिवड (रामनगर) – पुष्पा पवार
  • फुलेनगर – निंबा अहिरे
  • वासोळ – स्वप्नील अहिरे
  • भऊर – सुनीता पवार
  • खामखेडा – वैभव पवार
  • मटाणे – बिनविरोध
  • विठेवाडी (झिरे पिंपळ) – नानाजी पवार
  • डोंगरगाव – पौर्णिमा सावंत
  • वाजगाव (वडाळे) – शिंदूबाई सोनवणे
  • कनकापूर (कांचने) – बारकू वाघ
  • श्रीरामपूर – लिलाबाई पवार
  • सटवाईची वाडी – चंद्रकांत आहेर
  • चिंचवे – वैशाली पवार

       नाशिक (१४)

  • देवरगाव – पर्वता पिंपळके
  • लाडची – लेखा कराळे
  • गिरणारे – किरण कोरडे
  • यशवंतनगर – अगस्ती फडोळ
  • महिरावणी – कचरु वागळे
  • दुडगांव – एकनाथ बेझेकर
  • गणेशगांव – मालती डहाळे
  • तळेगाव – रवींद्र निंबेकर
  • अंजनेरी –
  • बेळगाव – ढगा शरद मांडे
  • एकलहरे –
  • सामनगांव – कविता जगताप
  • कोटमगाव –
  • ओढा – प्रिया पेखळे
  • साडगाव – सुरेश पारधे

       दिंडोरी (६)

  • कोकणगाव – खुर्द परशराम डंबाळे
  • जालखेड – ताईबाई झनकर
  • रामशेज-मानोरी – साहेबराव माळेकर
  • निळवंडी – मनीषा चारोस्कर
  • वनारवाडी – संगीता मोरे
  • उमराळे बु. – वसंत भोये

     सिन्नर (१२)

  • आशापूर – सुलोचना पाटोळे
  • कृष्णनगर – दत्तु गोफणे (ठाकरे गट)
  • किर्तांगळी – कुसुम चव्हाणके
  • कारवाडी – रुपाली जाधव
  • शास्त्रीनगर – जयश्री लोणारे
  • नांदुरशिंगोटे – शोभा बरके
  • पाटपिंप्री – नंदा गायकवाड
  • शहा – संभाजी जाधव
  • सायाळे – विकास शेंडगे
  • ठाणगाव – नामदेव शिंदे
  • उजनी – निवृत्ती सापनर
  • वडगाव पिंगळा – शेवंताबाई मुठाळ

        पेठ (१)

  • निरगुडे – बेबीनंदा खंबाईत

       त्र्यंबकेश्वर (१)

  • खंबाळे – भोईर

 

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -