घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानाचे विधानसभेत पडसाद; भुजबळांनी डिवचले, फडणवीसांना सावरले

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानाचे विधानसभेत पडसाद; भुजबळांनी डिवचले, फडणवीसांना सावरले

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांनी शाळा उघडण्यासाठी भीक मागितली, असे विधान काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटीलांच्या याच विधानाचे पडसाद आज विधानसभेतही पाहायला मिळाले. अनुदानित आणि विनाअनुदानिक शाळांसंदर्भातील राज्य सरकारच्या धोरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपहासात्मक टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी विधानसभेत विनाअनुदानित शाळांच्या मुद्द्यावर बोलताना आपल्या गळ्यातील मफलर काढून भीक मागण्याची अँटिंग करुन दाखवली आणि विनाअनुदानित शाळांनी निधी जमवण्यासाठी भीक मागून जर अशारितेने निधी जमावला तर परवानगी आहे का? असा खोचक, बोचरा सवाल उपस्थित केला. छगन भुजबळांची अॅटिंग पाहून विरोधी बाकावरील सर्व मंत्री जोरजोरात हसू लागले.

- Advertisement -

यावेळी चंद्रकांत पाटलांची बाजू सावरून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ उभे राहिले, आणि त्यांनी चांगला प्रश्न असल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावर विरोझी पक्ष नेते अजित पवार यांनी फडणवीसांना हा मुद्दा निकाला काढण्याची सूचना केली ज्यावर फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्टचं शब्दात मांडली आणि चंद्रकांत पाटलांच्या विधानाचे समर्थन नसल्याचे म्हटले.

विधानसभेतील हा प्रसंग नेमका काय होता?

विनाअनुदानित शाळा आणि त्यांच्या अनुदानाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरु होती. यावर निवेदनावर बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि त्यांनी इथून पुढच्या काळात अनुदानित शाळा देता येणार नाही, हा आपला कायदा आहे, असं ठोसपणे सांगितले. त्यांच्या निवेदनानंतर छगन भुजबस उभे राहिले आणि म्हणाले की, देशासमोर पुढील अडचणी वेगळ्या आहेत. पुरेश्या शाळा नसल्यामुळे सर्वांना पुरेसं शिक्षण देण्याची व्यवस्था पूर्ण होत नाही. म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येतात आणि विनाअनुदानित शाळा काढतात. या शाळेतील शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा खर्च भागवायचा असेल तर पैसा तर पाहिजे, मग अशाप्रकारचा निधी जमवण्यासाठी भीक मागून जर अशारितेने निधी जमावला तर परवानगी आहे का? असा खोचक सवाल करत चंद्रकांत पाटलांना डिवचले. यावेळी भुजबळांनी आपल्या गळ्यातील मफलर समोर पसरवत भीक मागण्याची अँटिंग केली. त्यांच्या या अॅटिंगमुळे सभागृहात विरोधकांचा एकचं हशा पिकला.

- Advertisement -

भुजबळांच्या याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस पटकन उभे राहिले. यावेळी फडणवीसांनी सभागृहात प्रबोधनकार ठाकरेंच्या ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवला. ज्या प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांना घेऊन आम्ही लोकांकडे गेलो आणि झोळी पसरवली असं लिहिलं.

यावर विरोधकांनी फडणवीसांना तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे तुम्ही समर्थन करत आहात का?, असा सवाल केला. त्यावर फडणवीसांनी आपण समर्थन करत नाही, असे म्हटले आणि भीक मागण्याची वेळ येणार नाही, राज्य सरकार त्यासंदर्भात सर्व गोष्टी करेल त्यावर भीकेचा विषय येणार नाही. असंही म्हणाले.

अजितदादांनी हाच मुद्दा हेरून आपण चंद्रकांतदादांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? असा सवाल अजित पवारांनी करत फडणवीसांच्या उत्तरावर असमाधान दर्शवलं. “आपल्या उत्तरात आणि चंद्रकांत दादांच्या भूमिकेत (अनुदानावर अवलंबून राहू नका) किती विरोधभास आहे. मग तुमचं म्हणणं खरं की चंद्रकांतदादांची भूमिका खरी?” असा थेट सवाल अजितदादांनी विचारलाअजितदादांच्या प्रश्नाला भुजबळ, वळसे पाटील यांनीही पुढे नेले. त्यावर फडणवीस जरासे गोंधळले आणि जरासे बॅकफूटला गेलेस विरोधकांनी थोडासा गोंधळ सुरु करताच फडणवीस बॅक फूटला गेले आणि सभागृहात जे बोललं जातं तेच खरं असतं, असं फडणवीस म्हणाले.

चंद्रकांतदादांची बाजू सावरण्यासाठी उठलेल्या फडणवीसांना अजित पवार आणि छगन भुजबळांच्या टोलेबाजी पुढे बॅकफूटला यावे लागले ज्यामुळे चंद्रकांतदादांचीही अडचण झाली.

यावर चंद्रकांत पाटलांनी स्वत: उभे राहून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. पैठणच्या संतपीठाला राज्य सरकारने 12 कोटी रुपये दिले आहे. त्यानंतर 23 कोटी रुपये पुन्हा नव्याने दिले आहेत. आणखी निधी लागल्यास तोही देण्याची सरकारची तयारी आहे. केवळ आपणही काही निधी गोळा करावा, असे आपण म्हणाल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


मेडिकल बोर्डच्या माध्यमातून 4500 जागांवर भरती करणार; आरोग्यमंत्री गिरीश महाजनांची घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -