घरमहाराष्ट्रनाशिककोरोना मदतनिधीसाठी येथे करा अर्ज

कोरोना मदतनिधीसाठी येथे करा अर्ज

Subscribe

नाशिक शहरात सहा ठिकाणी अर्ज स्विकारण्याची व्यवस्था

नाशिक : राज्य सरकारने कोरोना मृतांच्या नातेवाईकांसाठी ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत शहर परिसरातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी, त्यासाठीची प्रक्रिया सुकर व्हावी, महापालिकेने शहरातील सर्व सहा विभागीय कार्यालयांत नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करत अर्ज स्विकारण्याची व्यवस्था केली असल्याची आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

महापालिकेच्या मदत कक्षांच्या माध्यमातून अर्ज सादर करून घेणे, या प्रकरणांची तपासणी करणे या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना खातेप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. ज्या व्यक्तींचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला असेल, त्याच्या नातेवाईकांनी विभागीय कार्यालयात जाऊन या योजनेबाबतची सविस्तर माहिती घ्यावी. त्यानुसार अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. ज्या पाल्यांच्या एक किंवा दोन्ही पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, त्या पाल्यांना प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून देण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे.

- Advertisement -

अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी…

अर्ज करताना अर्जदाराने स्वतःची संपूर्ण माहिती, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, मृत व्यक्तीचा तपशील, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र, इतर नातेवाईकांचे ना हरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत दाखल करणे बंधनकारक आहे.

सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान येथे साधा संपर्क

  • पंचवटी विभाग – डॉ. विजय कुमार देवकर – 0253-2512023
  • नाशिकरोड विभाग – डॉ. जितेंद्र धनेश्वर – 02532461377
  • सातपूर विभाग – डॉ. योगेश कोशिरे – 02532350598
  • सिडको विभाग – डॉ. नवीन बाजी – 02532393425
  • पश्चिम विभाग – डॉ. चारुदत्त जगताप – 02532570493
  • नाशिक पूर्व विभाग – डॉ. विनोद पावसकर – 02532945295
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -