घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिकेची आधी वटवृक्ष तोडीची नोटीस; आता सुशोभीकरणाचा देखावा

नाशिक महापालिकेची आधी वटवृक्ष तोडीची नोटीस; आता सुशोभीकरणाचा देखावा

Subscribe

पर्यावरणमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे दुर्लक्षित परिसरात स्वच्छता मोहीम

नाशिक : उंटवाडीतील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी येथील दोनशे वर्ष जुना महाकाय वटवृक्ष तोडण्यासाठी नोटीस चिकटविणार्‍या महापालिकेकडूनच वटवृक्षाचा परिसर स्वच्छता मोहिम व सुशोभिकरणाची मोहिम राबविण्यात आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या वटवृक्षाची पाहणी करणार असल्याने महापालिकेने ही स्वच्छता मोहिम राबवली. मंत्र्यांच्या दौर्‍यामुळे का होईना महापालिकेला शहाणपण सुचले, अशीच प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

सिडकोतील त्रिमुर्ती चौक ते मायको सर्कल येथील मंजूर उड्डाणपुलासाठी ५८८ झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. पर्यावरणप्रेमींचा या उडडाणपुलाला वाढता विरोध पाहून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोड थांबवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शुक्रवारी नाशिक दौर्‍यावर येत असून ते स्वतः वटवृक्षाची पाहणी करणार आहेत.

- Advertisement -

त्यामुळे एरवी शहरातील हेरिटेज वृक्षांकडे दुर्लक्ष करणार्‍या महापालिका प्रशासनाला या परिसर स्वच्छतेची उपरती सुचली. गुरूवारी सकाळीच महापालिका कर्मचारी येथे दाखल होत परिसरातील कचरा उचलण्यात आला तसेच या वटवृक्षाच्या बाजूच्या परिसरातील मैदानावरचे वाढलेले गवतही कापण्यात येऊन मैदान स्वच्छ करण्यात आले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -