घरताज्या घडामोडीKonkan Railway: कोकण रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिनवर धावली एक्सप्रेस

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिनवर धावली एक्सप्रेस

Subscribe

डिझेलवर धावणाऱ्या रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत होता. मात्र इलेक्ट्रिक रेल्वेमुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.

कमी खर्चात आणि वेळेत चाकरमान्यांना आपल्या घरी सोडणाऱ्या कोकण रेल्वेसाठी कालचा दिवस फार महत्त्वाचा होता.  कोकण रेल्वेसाठी ( Konkan Railway)  कालचा दिवस ऐतिहासिक ठरला कारण इतिहासात पहिलांदाच कोकण रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावली. कोकण रेल्वेवरील दिवा ते रत्नागिरी पेसेंजर wcam3 ट्रेनला पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले. त्यामुळे हा दिवस तमाम कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाचा दिवस होता.

आजवर कोकण रेल्वे मार्गावर केवळ डिझेलवर चालणारे इंजिन जोडून एक्सप्रेस धावत होत्या मात्र पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिनवर कोकण रेल्वे धावली आहे. डिझेलवर धावणाऱ्या रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत होता. मात्र इलेक्ट्रिक रेल्वेमुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षात कोकण रेल्वेचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. अनेक मार्गावर विद्युतीकरण करण्यात येत असल्याने इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रवाशांची व्यक्त केली नाराजी

कोकण रेल्वेवर इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस धावणे हा सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण होता. या क्षणाचा एक व्हिडीओ एका युझरने शेअर केला. कोकण रेल्वेच्या इतक्या महत्त्वाच्या दिवशी कोकण किंवा मध्य रेल्वेकडून कोणतेही सेलिब्रेशन करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक इंजिनचे सुभोभिकरण करण्यात आले नाही, यामुळे प्रवाशांची नाराजी व्यक्त केली.


हेही वाचा – मालेगावात काँग्रेसला खिंडार,२८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -