घरमहाराष्ट्रनाशिकस्वच्छ दर्पण अभियानात; ओढा ग्रामपंचायत प्रथम

स्वच्छ दर्पण अभियानात; ओढा ग्रामपंचायत प्रथम

Subscribe

एकलहरे व वाडगावने द्वितीय क्रमांक पटकावला

केंद्र शासनाच्या स्वच्छता दर्पण उपक्रमाअंतर्गत हागणदारीमुक्त गाव तसेच जलसंवर्धन व वृक्षसंवर्धन या सामाजिक कामांत ओढा (ता. नाशिक) ग्रामपंचायत राज्यात एक क्रमांक, तर एकलहरे आणि वाडगाव ग्रामपंचायतींनी दुसरा क्रमांक पटकावला. जाखोरी गाव दहाव्या क्रमांकावर वर आहे. ओढा ग्रामपंचायतीने शासनाने दिलेले उद्दिष्टे वेळेत पूर्ण केल्याने देशात ५१ वा क्रमांक आलेला आहे.

देशातील प्रत्येक गावातील सरपंचाना ८ जून रोजी पत्र देऊन जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन याबाबत उल्लेख करून परिसरात व घराच्या छतावर पडणारे पाणी जमिनीत जलसंचय करण्यासाठी सूचना केल्या होत्या. २२ जून रोजी ग्रामसभा घेऊन २२ जून ते ३० जून दरम्यान लोकांना आवाहन करून जास्तीत जास्त पाणी अडवण्याचे आवाहन केले होते. त्याच सूचनेला नवी दिल्लीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छता दर्पण २०१९ हा कार्यक्रम जोडला होता. त्या अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक व सार्वजनिक शोष खड्डे, कंपोस्ट पीट आदी उपक्रमांवरून मूल्यांकन केले. नाशिक तालुक्यातील ओढा ग्रामपंचायतीने देशात ५१ वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच एकलहरे व वाडगाव ग्रामपंचायती देशात ५२ क्रमांकावर असून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. शासनाच्या सूचनांप्रमाणे काटेकोर काम केल्याने व सर्वांना सहभागी करून घेत गावकरी, कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांचा विशेष सहभाग असल्याची माहिती ग्रामसेवक दौलत गांगुर्डे यांनी दिली. नाशिक तालुक्यातील एकूण ७६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून सर्वात शेवटी नानेगाव जिल्ह्यात ३४९ क्रमांकावर आहे. ओढा ग्रामपंचायतला यापूर्वी पर्यावरण विकास, निर्मलग्राम, संत गाडगे बाबा, पंचायतीराज सशक्तीकरण आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

- Advertisement -

ग्रामस्थांचे विशेष कौतुक

लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन शासकीय उपक्रमात सहभाग घेतला असून शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय व ग्रामपातळीवरील सहकार्याने शक्य झाले. ग्रामस्थांचे विशेष कोतुक करावेसे वाटते. – विष्णू पेखळे, सरपंच

अभिमानास्पद

ग्रामस्थांचा सहभाग व शासकीय योजना यांचा मेळ घातल्याने योग्य पद्धतीने काम करता आले. केंद्र सरकारच्या योजनेत गावाचा दुसरा क्रमांक आल्याने अभिमानास्पद आहे. – मोहिनी जाधव, सरपंच एकलहरे ग्रामपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -