घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकरोडवरील बस-दुचाकी अपघातात एक ठार

त्र्यंबकरोडवरील बस-दुचाकी अपघातात एक ठार

Subscribe

दुचाकीचालक ठार; त्र्यंबक रोड, अमृत गार्डन येथील घटना

लक्झरी बस व दुचाकीची शनिवारी (ता.१३) दुपारी ४.१५ वाजता समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. हा अपघात त्र्यंबक रोडवरील अमृतगार्डन, अशोकनगर, सातपूर येथे झाला. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

राजकुमार पंचम यादव (३५, मूळ रा.गाजीपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा.अशोकनगर, सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लक्झरी बस नाशिककडून त्र्यंबककडे भरधाव वेगाने जात असताना विरूद्ध दिशेने राजकुमार यादव भरधाव वेगाने दुचाकीवरून जात होता. यादव हा अमृत गार्डनजवळ आला असता त्याला दुचाकीवर नियंत्रण करता न आल्याने दुचाकी व लक्झरी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात यादव याचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नातेवाईक उत्तरप्रदेशातील असल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. नागरिकांनी कुटुंबियांना धीर देत सर्वजण जिल्हा शासकीय रूग्णालयात आले. मोठ्या संख्येने नातेवाईक व नागरिक आल्याने रूग्णालय परिसरात गर्दी झाली. पुढील तपास सातपूरचे पोलीस करीत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -