घरमहाराष्ट्रकोकणासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी

कोकणासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी

Subscribe

पुणे, कोल्हापूर आणि कोकणासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. अचानक पडणाऱ्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि घशाला सतत पडणारी कोरड यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. तर पुण्यातील विश्रांतीवाडी भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, आज पावसाने पुणेकरांना गारवा दिला आहे. तर कोकणासह काही भागात पावसाचे ढग दाटून आले असल्याने या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात अशी शक्यता आहे.

वीज कडाडून पावसाला सुरुवात

पुण्यातील विश्रांतवाडी भागात आणि पिंपरी भागातही पाऊस सुरु झाला आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील धामणी गोळवली येथे काही प्रमाणात गारा पडल्या असल्याची माहिती समजते आहे. तर कोकणात काही ठिकाणी हलक्या सरींसह गारांचा पाऊस झाल्याचेही समजत आहे. तसेच साराऱ्यात देखील वीज कडाडून पाऊस सुरु झाल्याची माहिती स्कायमेटने दिली असून यासंदर्भात त्यांनी काही फोटोही स्कायमेट वेदरने ट्विट केले आहेत.

- Advertisement -

कोल्हापुरात गारांसह पाऊस

कोल्हापुरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात गारा देखील पडल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरात उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापुरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -