घरमहाराष्ट्रनाशिकझेडपी शाळांसाठी ओपन लिंक्सचे ‘विनोबा अ‍ॅप’

झेडपी शाळांसाठी ओपन लिंक्सचे ‘विनोबा अ‍ॅप’

Subscribe

या अ‍ॅपमुळे वेळेची होणार बचत

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य, त्यांची शिकवण्याची अभिनव संकल्पना व अनुभव आणि वर्षभर सातत्याने लागणारी शैक्षणिक संपूर्ण माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देणारे ‘विनोबा’ या मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेने काल लिंक्स फाऊंडेशनसोबत यासंदर्भात सामजंस्य करार केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ओपन लिंक्स फाऊंडेशनचे संजय दालमिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. पुणे जिल्हा परिषदेने या अ‍ॅपचा वापर सुरु केला आहे. त्याच धर्तिवर नाशिक जिल्हा परिषदेत हे अ‍ॅप वापरले जाणार आहे.

- Advertisement -

वेळेची होणार बचत

शिक्षकांना त्यांच्या दैंनदिन कामांमध्ये काही माहिती जमवण्यात खूप वेळ लागतो. वारंवार लागणारी माहिती ‘विनोबा’तून सहजरित्या उपलब्ध होईल. जसे की,

शाळेचा पोर्टफोलिओ : शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केलेलया उपक्रमांनी शाळेचा पोर्टफोलिओ बनतो.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे सामाजिक वर्गीकरण :मागास वर्गीय विद्यार्थी, भटक्या व विमुक्त जमाती, अल्पसंख्याक, दारिद्य्र रेषेखालील मुले, मुली वगैरे यांची माहिती ‘विनोबा’मध्ये एकदा अपलोड झाली की तिचा वारंवार वापर होऊ शकतो. सर्कल प्रमुख, ब्लॉक प्रमुख येथून त्यांना हवा तो अहवाल काढून घेऊ शकतात.वारंवार द्यावी लागणारी माहिती जसे पुस्तक वितरण, गणवेश वितरण, पायाभूत सुविधा बद्दल माहिती हेदेखील विनोबा कार्यक्रमातून प्राप्त होऊ शकते व शिक्षकांचा वेळ वाचतो. शिक्षकांनी केलेले काम इतरांबरोबर शेअर करतात, इतरांच्या पोस्ट्समधून शिकतात तसेच चांगल्या कामासाठी त्यांचा गौरव देखील होणार आहे.

प्रत्येक महिन्याला शिक्षकांचा होणार गौरव

शिक्षकांच्या लोकप्रिय होणार्‍या पोस्ट्स ना ‘पोस्ट ऑफ द मंथ’ म्हणून जिल्हास्तर, ब्लॉक स्तर, क्लस्टरस्तर तसेच शाळा स्तरावर गौरवले जाते. जिल्हा स्तरावर ‘पोस्ट ऑफ द मंथ’ जिंकणार्‍या शिक्षकांचा जिल्हा शिक्षण परिषदेमध्ये सत्कार केला जाणार आहे. शिक्षकांच्या चांगल्या कामाचे क्लस्टर प्रमुखांकडून, ब्लॉक प्रमुख तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्याकडून कौतुक होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -