घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा सरकारी बँकेच्या व्याजदारात २ टक्के कपात

जिल्हा सरकारी बँकेच्या व्याजदारात २ टक्के कपात

Subscribe

१३  टक्केऐवजी ११ टक्के दराने कर्ज आकारणी

नाशिक : सहकार क्षेत्रात १०३ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेने नियमित कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के कपात केली आहे. कर्जदारांकडून बँक यापुढे १३ टक्केऐवजी ११ टक्के दराने कर्ज आकारणी करणार असल्याची माहिती बँकेच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचे अध्यक्ष सुधीर पगार, उपाध्यक्ष मंदाकिनी पवार, ज्येष्ठ संचालक विजयकुमार हळदे यांनी बँकेच्या कारभाराविषयी माहिती दिली. बँकेची आर्थिकस्थिती सांगताना अध्यक्ष पगार म्हणाले, नियमित कर्जाची मर्यादा पाच लाख रुपयांवरुन २० लाख रुपये केली आहे. त्याचा व्याजदर हा ११ टक्के असेल. शैक्षणिक कर्ज मर्यादा दीड लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. त्याचा व्याजदरही कमी करुन साडेदहा टक्के केला आहे. मंजूर कर्ज रकमेच्या पाच टक्के शेअर्स व १५ टक्क्यांऐवजी १० टक्के वर्गणी ठेव आवश्यक असल्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बँकेने डिजीटल व्यावहारांना प्राधान्य दिले असून, फोन पे, गूगल पे, पे-टीएम यांसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही बँकेना आता चालू केल्याचे पगार व हळदे यांनी सांगितले. बँकेच्या उपाध्याक्ष मंदाकिनी पवार यांनी आभार मानले. यावेळी संचालक सुनील बच्छाव, दिलीप थेटे, शिरीष भालेराव, बाळासाहेब ठाकरे, दिपक अहिरे, प्रवीण भाबड, अजित आव्हाड, दिलीप सलादे, अशोक शिंदे, सुभाष पगारे, संदीप पाटील, महेश मुळे, सुनील गिते, प्रशांत गोवर्धने, मंगेश पवार, प्रशांत कवडे, धनश्री कापडणीस यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

सेवानिवृत्तांसाठी उद्या शिबीर

सेवानिवृत्त सभासदांसाठी उद्या सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत गंजमाळ येथील रोटरी क्लब होटलमध्ये आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरात मधुमेह व ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.किरण बिरारी, नेत्ररोग तज्ञ डॉ.अमित धांडे व दंतरोग तज्ञ डॉ.मयूर खाडे हे तपासणी करणार आहेत.

बँकेच्या नावीन्यपूर्ण योजना

  • वाहनकर्ज दुचाकी दोन लाख तर चार चाकीसाठी २० लाख रु. १० टक्के व्याज.
  • गृहकर्ज ८.९० टक्के दराने ५० लाख रुपयांपर्यंत मिळेल.
  • पेन्शन धारकांना एक लाख रुपयांपर्यत ११ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध.
  • शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ११ टक्के व्याजदाराने ५० हजार रुपये कर्ज.
  • ठेविदारांच्या व्याजदारात कुठलिही कपात केलेली नाही.
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -