घरमहाराष्ट्रनाशिकट्रकच्या धडकेत पादचारी ठार; पाच तास मृतदेह रस्त्यावर

ट्रकच्या धडकेत पादचारी ठार; पाच तास मृतदेह रस्त्यावर

Subscribe

पंचनामा करणारे व पोलीस यंत्रणा उपलब्ध न झाल्याने नागरिक संतप्त

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे शुक्रवारी, २६ एप्रिलला वडनेर रस्त्यावरील आवारे वस्तीजवळ एका पादचार्‍यास
वडाळीभोईकडून वडगावकडे जाणार्‍या ट्रकन उडवले. या घटनेत पदचारी जागेवरच गतप्राण झाला.

ही घटना शेतकर्‍यांनी पोलिसांना कळवली व पळून जाणार्‍या ट्रकचालकाला पकडून ठेवले. मात्र, खेडगाव येथील दोन कर्मचारी येथे सिन्नर बंदोबस्तासाठी असल्याने तर पोलीस हवालदार खताळ यांना वणी येथे ड्युटी असल्याने पंचनामा करणारे व पोलीस यंत्रणा उपलब्ध न झाल्याने तब्बल पाच तास मृतदेह रस्त्यावर पडून होता. उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह वणी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. खिशातील आधार कार्डवरून हा इसम जळगाव जिल्ह्यातील असून भीमा रामा वंजारी (वय ६५) असे नाव आहे. याबाबत प्रवीण पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली वणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -