घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक बाजार समिती निवडणुकीत पिंगळें विरूद्ध पिंगळे; खुर्चीचा मोह की कौटुंबिक कलह

नाशिक बाजार समिती निवडणुकीत पिंगळें विरूद्ध पिंगळे; खुर्चीचा मोह की कौटुंबिक कलह

Subscribe

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी माजी सभापती देविदास पिंगळे विरूद्ध माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांच्या लढतीची चर्चा सहकारक्षेत्रात सुरू आहे. सध्या नाशिक बाजार समिती निवडणूक अंतिम टप्प्यात आली असली, तरी चुंभळे विरूद्ध पिंगळे या पारंपरिक लढतीपेक्षाही दोन भावांच्या म्हणजे पिंगळे विरूद्ध पिंगळे यांच्या लढतीची चर्चा रंगत आहे.

दोन्ही उमेदवार हे सख्खे भाऊ जरी असले तरी बाजार समिती निवडणुकीमुळे सध्या त्यांच्यात कटूता आली असल्याची चर्चा आहे. यापूर्वी माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या बाजार समिती निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे व एकहाती निवडणूक यंत्रणा सांभाळणारे गोकूळ पिंगळे हे स्वतः यावेळी बाजार समिती निवडणुकीसाठी आपले नशीब अजमावू पाहत आहेत. यापूर्वीदेखील गोकूळ पिंगळे यांनी बाजारसमितीसाठी अर्ज दाखल केले होते. परंतु, देविदास पिंगळे यांच्या सांगण्यावरून ते अर्ज माघारीदेखील घेतले होते.

- Advertisement -

परंतु, यंदा गोकूळ पिंगळे हे अर्ज माघारी घेण्याच्या वेळेच्या अगोदर निवडणूक कार्यालयात हजर राहूनदेखील त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. तेव्हापासून दोन्ही पिंगळे भावांमध्ये आलबेल असल्याचे समोर आले. देविदास पिंगळे असो की गोकूळ पिंगळे यांचे नातेगोते एक आहे. मित्र परिवारदेखील सारखा असल्याने आता मदत नक्की कुणाला करावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शिवाजी चुंभळे, देविदास पिंगळे आणि गोकूळ पिंगळे हे तिघे ही सोसायटी सर्वसाधारण गटातून उमेदवारी करत आहेत. त्यामुळे या गटाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर, गोकूळ पिंगळे विजयी झाले तर ते सत्तास्थापन करणार्‍या गटाला पाठिंबा देणार की अलिप्त राहून भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाचे मुद्दे 

  • माजी सभापती देविदास पिंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना गोकूळ पिंगळे यांच्या माघारी न होण्यामागे वैद्यकीय कारण असल्याचे सांगितले होते. परंतु, काही खुद्द गोकूळ पिंगळे हे अर्ज माघारी घेण्याच्या काही मिनिटे अगोदर पासूनच निवडणूक कार्यालयाबाहेर उभे होते. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही त्यामुळे तिथेच वादाची ठिणगी पडली.
  • माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यावरील पणन संचालकांकडील क्लिनचिट प्रकरणात टांगती तलवार असल्याने देविदास पिंगळे यांच्यावर कारवाई झाली तर ते जवळपास ६ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे कदाचित गोकूळपिंगळे यांच्या माध्यमातून पिंगळेंची ही खेळी असावी, अशीही चर्चा सुरू आहे.
  • माजी सभापती देविदास पिंगळे आणि माजी नगरसेवक गोकूळपिंगळे यांच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाली असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे. तर, चुंभळे गटाने ही गोकूळ पिंगळेंवर बारीक लक्ष ठेवले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -