घरक्राइमलग्नाचे आमिष दाखवत बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार

Subscribe

अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार

नाशिक : संशयित तरुणाने एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवत तसेच धमकावून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील सय्यद ऊर्फ राम पंडित, असे संशयिताचे नाव आहे. पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिच्या मैत्रिणीने संशयित शकील सय्यद याच्याशी त्याचे नाव राम पंडित असल्याचे खोटे सांगून ओळख करून दिली. त्यानंतर दोघांची ओळख वाढून ते एकमेकांना भेटू लागले. त्याचा गैरफायदा घेत संशयिताने तरुणीस शालिमार येथील एका लॉजवर घेऊन जात लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तिने नकार दिला असता तिचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी या तरुणाने दिली. तसेच तिला मारहाणही केली. घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत बळजबरीही केली. अखेर त्रस्त तरुणीने कुटुंबीयांना हा सर्व प्रकार सांगून भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. दरम्यान, संशयित मूळचा औरंगाबादचा असल्याचे समजते आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -