घरमहाराष्ट्रनाशिकयेवल्याचा फेटा बांधून रवी शास्त्री वर्ल्ड कपसाठी रवाना

येवल्याचा फेटा बांधून रवी शास्त्री वर्ल्ड कपसाठी रवाना

Subscribe

शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लावली हजेरी

शिर्डीला साईसमाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेले भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना शगुन म्हणून साईबाबांच्या चरणी लावलेला आशीर्वादरूपी फेटा बांधण्याचा मान येवला येथील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांना मिळाला. विश्वकपसाठी भारतीय क्रिकेट संघ बुधवारी (२२ मे) इंग्लडला रवाना झाला. आदल्या दिवशी मंगळवारी रवी शास्त्री दर्शनासाठी शिर्डीला आले होते.

यावेळी फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी शास्त्री यांना फेटा बांधून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ३० मेपासून होणार्‍या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना झाला आहे. भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीसाठी संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्डीला येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीकांत खंदारे यांनी शास्त्री यांना आशीर्वादरूपी फेटा बांधला. यावेळी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापक चंद्रकात गुप्ता, राजेंद्र भुजबळ, उपस्थित होते. साईबाबांच्या आशीर्वादाने भारत विश्वकरंडकावर आपले नाव कोरेल, असा आशावाद रवी शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केला. साईबाबांचे भक्त शास्त्री अनेकदा दर्शनासाठी शिर्डीला येतात. मंगळवारी मधान्ह आरतीला ते हजर होते. दर्शनानंतर साईबाबा संस्थानतर्फे त्यांचा फेटा बांधून सत्कार झाला. यावेळी त्यांनी भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीसाठी प्रार्थना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -