घरमहाराष्ट्रनाशिककंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘सिव्हिल’मध्ये कामबंद

कंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘सिव्हिल’मध्ये कामबंद

Subscribe

वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारला आंदोलनाचा मार्ग, कंत्राटदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागातील (एसएनसीयू) कंत्राटी कर्मचार्‍यांनी सोमवारी (ता.२७) दिवसभर कामबंद आंदोलन केले. कर्मचार्‍यांनी आंदोलन केल्याने रुग्णालयातील कंत्राटदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू कक्षात पाच पुरुष कर्मचारी व एक महिला कर्मचारी कार्यरत आहे. त्यांना खासगी संस्थेमार्फत नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांना कंत्राटदाराकडून दरमहा पाच हजार रुपये वेत दिले जात आहे. मात्र, कंत्राटदार कर्मचार्‍यांना नियमित वेतन देत नाही. जानेवारी २०१९ या महिन्यात कंत्राटदाराने वेतन थकवले होते. त्यावेळी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले असता कंत्राटदाराने लगेच वेतन दिले. एप्रिल महिन्याचे वेतन कंत्राटदाराने अद्याप दिलेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक झळा बसू लागल्या आहेत. मात्र, त्याकडे कंत्राटदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी पुन्हा सोमवारी कामबंद आंदोलन केले. याप्रकरणी कर्मचार्‍यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांना निवेदन दिले आहे. कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केल्याने ‘एसएनसीयू’ कक्षात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -