घरमहाराष्ट्रनाशिकसाहित्य संमेलनासाठी शहरातील चार ठिकाणांची पाहणी

साहित्य संमेलनासाठी शहरातील चार ठिकाणांची पाहणी

Subscribe

स्थळ निवड समितीकडून ठक्कर डोमला प्रथम स्थान

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला २०२० च्या साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने सोमवारी (ता.१५) शहरातील चार ठिकाणांची पाहणी केली. समितीमार्फत पाहणी अहवाल साहित्य महामंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. शहरातील ठक्कर डोम हे संमेलनासाठी संयुक्तिक आहे. १० ऑगस्टपर्यंत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ढाले-पाटील म्हणाले, २०२० चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार की उस्मानाबादला, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थळ पाहणीच्या अहवालानंतर संमेलनाचे स्थळ महामंडळ निश्चित केले जाणार आहे. साहित्य महामंडळाकडे लातूर, उस्मानाबाद, विदर्भ व नाशिक असे चार प्रस्ताव दाखल झाले होते. महामंडळाची बैठक होऊन त्यात लातूर व विदर्भाचा प्रस्ताव बाद ठरविण्यात आला. उर्वरित उस्मानाबाद व नाशिकचे प्रस्ताव सध्या स्पर्धेत आहेत.

- Advertisement -

तीन दिवसात नाशिक आणि उस्मानाबाद येथील ठिकाणांची पाहणी स्थळ निवड समिती करणार आहे. त्या अनुषंगाने सोमवारी (ता.१५) स्थळ निवड समितीने शहरातील ठक्कर डोम, डोंगरे वसतिगृह मैदान, भोसला मिलीटरी स्कूल मैदान, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान व छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणांची पाहणी केली आहे. नाशिकमध्ये संमेलनासाठी जागेची अडचण नाही. नाशिक आणि उस्मानबादचा पाहणी अहवाल साहित्य महामंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. बैठकीत सदस्य बहुमत देतील त्या ठिकाणी संमेलन होईल.
यावेळी स्थळ निवड समितीचे डॉ. दादा गोरे, प्रकाश पायगुडे, प्रदिप दाते, प्राचार्या प्रतिभा सराफ, रामचंद्र सांळुखे, के. एस. अतकरे, सावानाचे किशोर पाठक, गिरीश नातू, मधुकर झेंडे, जयप्रकाश जातेगावकर, वसंत खैरनार, प्रा संगीता बाफना, डॉ. शंकर बोर्‍हाडे आदी उपस्थित होते.

नाशिक संमेलनासाठी संयुक्तिक

२०२० च्या साहित्य संमेलनासाठी सावाना संयुक्तिक आहे. शहरात निवास व्यवस्था उत्तमरित्या आहे. संमेलनासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच संमेलनासाठी सावानाकडे निधी उपलब्ध आहे, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले-पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

स्थळ निवडीचे निकष

संमेलनासाठी मुबलक जागा, मनुष्यबळ, निधी संकलन, संमेलन न झालेली ठिकाण, उपेक्षित असलेली ठिकाणे हे साहित्य संमेलन निवडीचे निकष आहेत. त्यानुसार साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -