घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरातील शाळा १५ नोव्हेंबरपासून

नाशिक शहरातील शाळा १५ नोव्हेंबरपासून

Subscribe

महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुटी वाढवण्यात आल्याने येत्या १५ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांना १० पर्यंत सुटी होती. त्यामुळे त्या ११ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या. मात्र, महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुटी वाढवण्यात आल्याने येत्या १५ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. मात्र, दुसरीकडे माध्यमिकच्या शाळा या २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

दिवाळी सुटीचे नियोजन करत स्थानिक शिक्षणाधिकार्‍यांनी १ ते २० नोव्हेंबर अशी सुटी जाहीर केली होती. त्यात प्राथमिक विभागाने वेगळ्या तारखा जाहीर केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अखेर शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक प्रसिद्ध करत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान सुटी जाहीर केली. त्यामुळे ११ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार्‍या होत्या. मात्र, नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. एम. कदम यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून शाळांची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता या शाळांची दिवाळी सुटी 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सोबतच 21 नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळे त्यांचे वर्ग आता 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शाळा या  11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. मात्र त्याही 15 नोव्हेंबरपासून सुरू होतील.

- Advertisement -

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -