घरताज्या घडामोडीST Workers Strike: निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, पडळकरांचा आझाद...

ST Workers Strike: निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, पडळकरांचा आझाद मैदानावर मुक्काम

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा गुरुवारी १४वा दिवस आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनाला भाजपकडून पाठींबा देण्यात आला असून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मुक्काम केला आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर म्हणाले. पडळकरांसोबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोतसुद्धा आझाद मैदानावर रात्रभर उपस्थित होते. राज्य सरकारने आतापर्यंत एकूण ९१८ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्य सरकारची मार्ग काढण्याची इच्छा नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस आहे. राज्यातील सर्वच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होत आहे. परंतु राज्य सरकार दुतोंडी भूमिका घेत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशमधील प्रत्येकी १ कर्मचारी आणि २ महिला कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. परंतु मंत्री त्यांच्यासोबत बोलायला तयार नव्हते सदाभाऊ खोत यांच्याशी बोलू असे म्हणाले. एका बाजूला बोलतात कर्मचारी चर्चेला तयार नाहीत. राज्य सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी परिवारासह आझाद मैदानावर येण्याचे आवाहन पडळकर यांनी केलं आहे. तसेच जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांसोबत जेवताना आणि मैदानावरच मुक्काम केला असल्याचा फोटो पडळकर यांनी शेअर केला आहे.

आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना कोणतीच मदत केली नाही ही क्रूरता राज्य सरकारमध्ये आली कुठून आली असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच हे कर्मचारी काय पाकिस्तानातून आलेत का? राज्यातील सर्व जनता एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. एसटी डेपो बंद झाले हे काही पक्षांनी नाही केलं आहे तर कर्मचाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून राजकारण करण्यात येत असल्याचे सांगून हा विषय डावलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. इथे मराठी माणसं येऊन बसलेत पाकिस्तान आणि चीनमधून आले नाही या त्यांच्याशी बोलायला असे सदाभाऊ खोत म्हणाले.

- Advertisement -

खोत, पडळकरांच्या नेतृत्वात अनिल परबांसोबत बैठक

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत हे परिवहन मंत्री अनिल परब यांना भेटणार आहेत. या दोन नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर खलबत होणार आहे.


हेही वाचा :  ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -