घरताज्या घडामोडीनाशिकच्या शिवप्रेमींकडून कर्नाटकच्या मुख्यामंत्र्यांना साडी-चोळी

नाशिकच्या शिवप्रेमींकडून कर्नाटकच्या मुख्यामंत्र्यांना साडी-चोळी

Subscribe

नाशिकमधील शिवप्रेमींची संतप्त भावना; शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ वक्तव्य करणार्‍या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारने राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी नाशिकमधील शिवप्रेमींनी आंदोलन केले. महिलांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साडी, चोळी पोस्टाने पाठवली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवरायांच्या आश्वारुढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करत आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

बंगळुरु येथील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकिकडे वाराणसीमध्ये छत्रपती शिवरायांचा गौरव करतात. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री असे बेताल वक्तव्य करुन शिवरायांचा अवमान करतात. त्यामुळे पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी नाशिकमधील मावळ्यांनी केली. थोर महापुरुषांच्या स्मारकांना व पुतळ्यांना 24 तास पोलीस बंदोबस्त देण्याची मागणीही त्यांनी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कर्नाटक सरकार मुर्दाबाद’, ‘मोदी सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्या’ अशा घोषणाही दिल्या. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून तमाम जनतेची माफी मागावी, अशी मागणीही या शिवप्रेमींनी केली. यावेळी अ‍ॅड. अनंत जगताप, सुनील बागूल, अ‍ॅड. अजिंक्य गिते, करण गायकर, योगेश कापसे, पल्लवी पाटील, माधवी पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दुग्धाभिषेक

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक, मखमलाबाद रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मंत्रघोषात दुग्धअभिषेक करण्यात आला. यावेळी पुष्पवृष्टी अन् महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, सागर बागूल, ज्ञानेश्वर जाधव, विवेक घडूसे, अ‍ॅड. महेश आहेर, सदानंद पवार, बारकू कोशिरे, गोपी नागरे, पूजा सिंगार, मनीषा काटे, अभी मालोदे, अ‍ॅड. अनिल गायकवाड, प्रसाद औटे, बाळासाहेब भोसले, सुनील चौरे, विलास आहेर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चांदीच्या शिवटाकास दुग्धाभिषेक

अखिल भारतीय मराठा महिला महासंघाचे शहर सरचिटणीस रोहिणी उखाडे यांच्या नेतृत्वाखाली उखाडे परिवाराकडून निषेध करण्यात आला. म्हसरूळ येथील शिवप्रेमी प्रकाश उखाडे यांच्या संकल्पनेतून २०१६ पासून देवघरात स्थान दिलेल्या नाशिक जिल्ह्यातील पहिल्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या टाकासही दुग्धाभिषेक करून कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध नोदवण्यात आला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -