घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून मुंबईतील रस्ते गुळगुळीत

मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून मुंबईतील रस्ते गुळगुळीत

Subscribe

विधान भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यात अनेक स्पीड ब्रेकर्स, खड्डे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मानेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्याची डागडुजी करण्यात येत आहे.

बुधवार पासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच मानेची शस्रक्रिया पार पडली. त्यामुळे आजारपणामुळे मुख्यमंत्री अधिवेशनाला हजेरी लावणार की नाही या प्रश्नावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून ते अधिवेशनाला येणार असल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार या शिक्कामोर्तब झाला. आता मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार असल्याने प्रशासनाला खाडकन जाग आल्याने प्रशासन अलर्ट झाले असून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापासून विधान भवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डागडुजीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचे दुखणे असल्याने अधिवेशनला जाताना त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विधान भवनाकडे जाणारा काही किलोमीटरचा रस्ता गुळगुळीत करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ज्या रस्त्याने विधान भवनाकडे जाणार आहेत. त्या रस्त्यात अनेक स्पीड ब्रेकर्स, खड्डे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मानेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्याची डागडुजी करण्यात येत आहे. खरंतर मुख्यमंत्री ज्या रस्त्याने विधान भवनाकडे जाणार आहेत त्या रस्त्यावरुन दररोज अनेक VIP मंडळी जात असतात. मात्र त्या रस्त्याची अवस्था म्हणावी तशी चांगली नाही. अनेक दिवस त्या रस्त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते मात्र अधिवेशनासाठी मुख्यमंत्री त्या दिशेने जाणार असल्याने प्रशासनाला रस्ता दुरुस्त करण्यासाठी जाग आली असे म्हणावे लागेल.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता. त्याच्या मानेचे दुखणे वाढल्याने त्यांच्यावर गिरगावातील सर.एच.एन.रिलायन्स हॉस्पिटलमध्ये १२ नोव्हेंबर रोजी शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर २२ दिवस मुख्यमंत्री ठाकरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे.


हेही वाचा –  मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम, आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? – अजित पवार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -