घरमहाराष्ट्रनाशिकएसटीला पासिंगचे ऑनलाइन पेमेंट जमेना!

एसटीला पासिंगचे ऑनलाइन पेमेंट जमेना!

Subscribe

नाशिक विभागिय कार्यशाळेतील अडचण

वेळेची बचत करून काम मार्गी लावण्यासाठी ऑनलाईनचा अंगीकारक बहुतांश शासकीय कार्यालयांनी केलेला आहे. मात्र एसटी महामंडळाचे काम अजूनही कागदपत्रांच्या ढिगार्‍यातच सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन काम करताना एसटी कर्मचार्‍यांची कशी पंचायत होते, याचा प्रत्यय नाशिक विभागाीय कार्यशाळेत आला आहे. आरटीओकडून गाड्यांचे पासिंग करताना याचा खर्च ऑनलाइन जमा करण्याचे काम येथील कर्मचार्‍यांना जमत नसल्याने संगणक धुळखात पडले आहे.

आरटीओकडून एसटी गाड्यांचे परिक्षण करून घेण्यासाठी नशिक विभागीय कार्यशाळेला हाकेच्या अंतरावर जावे लागते. मात्र, आरटीओच्या ऑनलाइन कार्यप्रणालीला जोडून काम करण्यासाठी या कार्यशाळेतील कर्मचार्‍यांना ते काम जमत नसल्याने संगणकीय ज्ञान शेकडो मैल दूर आहे, ही वस्तुस्थिती आहे. पेठरोड येथील एसटीच्या विभागीय कार्यशाळेत जिल्ह्यातील 13 डेपोंच्या बसगाड्यांचे मशिन दूरूस्ती, अपघातानंतर गाड्यांची दुरूस्ती , त्याचबरोबर रंगरंगोटी, कुशनिंग, इलेक्ट्रीक कामे करण्यात येतात. यातील बहुतेक कामे आरटीओ पासिंगच्या संबंधित असल्याने दर दिवसाला आरटीओच्या निकषानुसार गाडी तयार करून ती पासिंगला पाठविण्याचा हा सोपास्कार एसटीचे कर्मचारी तांत्रिक कौशल्यामुळे पार पाडतात. पण, अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यकस्तरावर कर्मचार्‍यांना संगणक हाताळता येत नसल्याने आरटीओचे ऑनलाइन काम पार पाडता येत नाही. त्यामुळे कार्यशाळेतील ही संगणकीय अडचण लक्षवेधी ठरलेली आहे.

- Advertisement -

आरटीओने आता कोणत्याही कामाचे शुल्क आकारणी आता ऑनलाईनवर आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस आदी नेटबॅकिंगद्वारे सुरु केलेले आहे. त्यामुळे एसटीच्या पासिंगचा खर्चही विभागीय कार्यशाळेला आता ऑनलाइनच जमा करण्याचे क्रमप्राप्त झालेले आहे. पूर्वी कार्यशाळेतून पासिंग किंवा इतर कोणताही आरटीओ शुल्क हे पावत्याद्वारे भरले जात होते. त्यानंतर गाड्या आरटीओच्या परिक्षणासाठी पाठविल्या जात होत्या. हीच प्रक्रिया येथील अधिकार्‍यांकडून आणि कर्मचार्‍यांकडून पूर्वीपासून करावी लागत होती. आता आरटीओनेच ऑनलाइन शुल्क भरण्याचे फर्माण सोडल्याने एसटी कार्यशाळेतील व्यवस्थापनाला ते ऑनलाइन भरावेच लागत आहे. त्या शिवाय गाड्यांचे पासिंग रखडते.

संगणक धुळखात

कार्यशाळेत संगणक आणण्यात आलेले आहे. पण ते ऑपरेट करायचे कोणी, असा प्रश्न येथील अधिकार्‍यांना पडला आहे. कारण संगणक प्रणाली, ऑनलाईन सेवा आणि इंटरनेट बॅकिंग हे तंत्रज्ञान कोणालाच माहित नसल्याने कार्यशाळेतील हा संगणक सध्या धुळखात पडला आहे. त्यामुळे गाड्यांचे पासिंग शुल्क रकमेद्वारेच भरावे लागत आहे, याला आरटीओचा नकार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -