घरमहाराष्ट्रनाशिकसुरेश पाटील पुन्हा भाजपात

सुरेश पाटील पुन्हा भाजपात

Subscribe

विधानसभा निवडणुकीत आमदार प्रा. देवयानी फरांदेंना अंतर्गत स्पर्धक वाढला

महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून नशिब आजमावणार्‍या सुरेश पाटील यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पून्हा एकदा पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने विधानसभा निवडणुकीत आमदार देवयानी फरांदे यांना पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तयार झाल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत सुरेश पाटील यांना डावलून पक्षाने हेमंत धात्रक यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली. पाटलांच्या उमेदवारीने भाजपच्या मतांची विभागणी होऊन धात्रक पराभूत झाले. तर समीर कांबळे या निवडणुकीत विजयी झाले. या पार्श्वभूमीवर भाजपने पाटील यांना पक्षातून बडतर्फ केले होते. दोन वर्षानंतर पाटील यांना पक्षाने पून्हा एकदा रेड कार्पेट टाकले आहे. शुक्रवारी ५ एप्रिलला श्रध्दा लॉन्स येथे पालकमंत्री गिरीश महाजन व खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या युतीच्या महामेळाव्यात पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. सुरेश पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असून त्यामुळे आता विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीटासाठी संघर्ष करावा लागेल असे दिसते. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्या उमेदवारीच्या शर्यतीत मोठा अडथळा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -