घरमहाराष्ट्रनाशिकमुलं मायदेशी सुखरूप परतली पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

मुलं मायदेशी सुखरूप परतली पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

Subscribe

युक्रेनहून नाशिकचे १६ विद्यार्थी परतले; जिल्हा प्रशासनाची माहिती

नाशिक: रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून गंगा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत नाशिकमधील १६ विद्यार्थी मायदेशी परतले असून, त्यांचे अक्षरशः वाजत-गाजत वरात काढून स्वागत करण्यात आले. आपल्या काळजाचा तुकडा आलेला पाहून आई-वडिलांच्या आनंदाला पारावार नव्हता. उरलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी दोघे दिल्लीला पोहचणार असून, उर्वरित दोघे परतीच्या मार्गावर आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची धग दिवसेंदिवस वाढतच आहे. युक्रेनमध्ये भारतातील सुमारे २३ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. महाराष्ट्रातूनही वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये स्थायी झाले आहेत. युद्धामुळे युक्रेनमध्ये रशियाने जोरदार हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले. नाशिक जिल्ह्यातील २० विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेत. त्यांची तातडीने सुटका करा, अशी मागणी त्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. खासदार हेमंत गोडसे यांनाही हे पालक भेटले. अखेर प्रयत्नाला यश आले असून, जवळपास सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. त्यातले 16 जण नाशिकला येऊन
पोहोचले आहेत.

- Advertisement -

बंकरमध्ये काढले दिवस

नाशिकची आदिती देशमुख युक्रेनमधून परतली. तिने आपल्या आठवणी सांगितल्या. युद्धाचे थरारक अनुभव कथन केले. बंकरमध्ये दिवस काढावे लागले. सारे जीव मुठीत धरून बसले होते. मात्र, आम्ही भारतीय असल्यामुळे जास्त त्रास सहन करावा लागला नाही. सुखरूप पोहचलो हे मोठे आहे, अशा भावना तिने व्यक्त केल्या.

किव्हमधून तरुण आला

युक्रेनमधील किव्ह शहरात नाशिकमधील राजीवनगर येथील सागर चव्हाण हा तरुण अडकला होता. सागरसह त्याच्यासोबत नोकरीसाठी असलेले एकूण चाळीस तरुण मायदेशी सुखरूप परतले आहेत. त्यांच्याही पालकांचा आनंद गगनात मावेनासा होता.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -