घरमहाराष्ट्रनाशिकडेल्टा प्लस रुग्ण घरीच झाले बरे

डेल्टा प्लस रुग्ण घरीच झाले बरे

Subscribe

नाशिक जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे दोन रुग्ण

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रभावानंतर डेल्टा प्लसचा धोका वाढू लागला असून नाशिक जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळून आले. परंतु हे दोन्ही रुग्ण घरीच ठणठणीत बरे झाल्यानंतर चार महिन्यांनंतर त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. मात्र, प्रशासनाने रुग्ण आढळून आलेल्या भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण सिन्नर तालुक्यातील ठाणगाव व दुसरा रुग्ण नाशिक शहरातील तिडके कॉलनी येथील रहिवासी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हे दोन्ही रुग्ण एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित होते. चार महिन्यानंतर या रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांची प्रकृती ठीक असून हे रुग्ण घरीच बरे झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविले जातात. कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेणारी जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचणी एनआयव्हीमध्ये केली जाते. कोरोना विषाणूमध्ये झालेला बदल, त्याचा प्रादुर्भाव आणि त्याबाबतची माहिती जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून स्पष्ट होते. नाशिकमधून पाठ वण्यात आलेल्या १५५ स्वॅबपैकी ३० जणांच्या स्वॅबमध्ये ६ ऑगस्टला प्राप्त झालेल्या अहवालात डेल्टा व्हेरिएंटचे ३०रुग्ण आढळून आले होते. डेल्टा व्हेरिएंट हा डेल्टा प्लस व्हेरिएंटइतका धोकादायक नसल्यामुळे आरोग्य यंत्रणाही फार गंभीर नव्हती पण सोमवारी रात्री उशिरा आरोग्य विभागाला मिळालेल्या रुग्णांच्या चाचणी अहवालात दोन रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट या विषाणूची लागण झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

३ ते २८ एप्रिलदरम्यान दोघा बाधितांच्या नमुन्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला आहे. यापैकी एका रुग्णाशी संपर्क झाला असून, त्याने गृहविलगीकरणात कोरोनावर मात केली आहे. अन्य एकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisement -

 

एप्रिलमधील दोन कोरोना बाधितांच्या नमुन्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळलेे. हे रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नागरिकांनी घाबरू नये. दोघांच्या वैद्यकीय तपासणीसह अन्य सूचना दिल्या आहेत.
                                – डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -