घरमहाराष्ट्रनाशिकलव्ह, सेक्स, धोका : प्रेमसंबंध तोडल्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी

लव्ह, सेक्स, धोका : प्रेमसंबंध तोडल्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी

Subscribe

मुंब्रा येथील युवकावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नाशिक: प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणातून मुंब्रा येथील युवकाने खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची नाशिकच्या पीडित महिलेला धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित सलीम उर्फ आसिफ उस्मान खान (वय ३४, रा. मुंब्रा, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला व संशयित आरोपी खान हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. २०११ मध्ये दोघेही एकाच कंपनीत नोकरीला होते. संशयित खान याने माहिलेशी ओळख वाढवली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यावेळी त्याने महिलेसोबतचे खासगी फोटो काढून घेतले होते.

- Advertisement -

काही महिन्यांनी पीडित महिलेने खानसोबतचे प्रेमसंबंध तोडले. राग अनावर झाल्याने संशयित खान प्रेमसंबंध तोडल्यास खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत महिलेच्या नातेवाईक व मित्रांना पाठवण्याची धमकी दिली. शिवाय, खान याने फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप व ईमेलव्दारे वॉच ठेवत मानसिक छळ केला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -