घरमहाराष्ट्रनाशिकउभ्या ट्रकला मागून दोन वाहनांची धडक; दोन जण गंभीर जखमी

उभ्या ट्रकला मागून दोन वाहनांची धडक; दोन जण गंभीर जखमी

Subscribe

महामार्गावरचे अपघात सत्र सुरूच

इगतपुरी : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पिंपरीफाटा येथे मालवाहू अवजड ट्रक (एमएच ३-सीव्ही १६३२) या वाहनाचे चाक अचानक पंक्चर झाले. ते चाक बदलण्याचे काम चालक व वाहक करीत असताना उभ्या असलेल्या या वाहनाला नाशिक दिशेने मागून येणार्‍या दोन अवजड वाहनांनी जोरदार धडक दिली. या धडकेत धडक दिलेला एक ट्रक रस्त्याचा बाजूला असलेल्या नालीत कोसळल्याने यात दोन जण जखमी झाले.

जखमींना महामार्ग वाहतूक पोलीस पथक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. धडक देणारा ट्रक चालक धडक देऊन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महामार्ग विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांनी दखल न घेतल्याने शेकडो अपघातात नाहक बळी या ठिकाणी जात असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहे. या भागात होणार्‍या उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू असून कोणतेही निर्देश फलक लावलेले नसून या कामाबाबत माहितीही उपलब्ध नाही.

- Advertisement -

यामुळे अपघात वाढत असून नाहक लोकांचा बळी जात असल्याने खासदार हेमंत गोडसे यांना या भागाकडे लक्ष द्यावे अशी स्थानिक नागरिकांनी आशा व्यक्त केली. झालेल्या घटनेतील गंभीर जखमींना ग्रामिण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यावेळी घटनास्थळी दोन्ही ट्रक बाजूला करण्यात येऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाने मदत केली. पुढील तपास महामार्ग पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांसह पोलीस पथक करीत आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -