घरमहाराष्ट्रनाशिकरस्ते आता ओम पुरींच्या गालासारखे!

रस्ते आता ओम पुरींच्या गालासारखे!

Subscribe

मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा बरळले

भुसावळ : ‘रस्त्याबाबत अभिनेत्रीचे नाव घेऊन चुकीचं बोलून गेलो, त्यामुळे आता तो गाल सोडला आणि ओम पुरींच्या गाल पकडला. त्यामुळे ओम पुरींच्या गालावर कोणी टीका करू नये’, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या विधानावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहे.

शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आपल्या बेधडक विधानांमुळे कायम चर्चेत असतात. भुसावळ येथे शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना त्यांनी आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालासारखे रस्ते असल्याचे विधान करून शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील अडचणीत सापडले होते.

- Advertisement -

त्यांनी याप्रकरणी माफीसुद्धा मागितली होती. पण, ‘रस्त्याबाबत अभिनेत्रीचे नाव घेऊन चुकीचे बोलून गेलो. त्यावेळी मीडियाने खूप टीका केली होती. त्यामुळे आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला. त्यामुळे ओम पुरींच्या गालावर कोणी टीका करू नये. आम्ही काम करत असतो त्याबद्दल उदाहरण म्हणून बोलतोय’ असं गुलाबराव पाटील म्हणाले.

मटन खाता कुणाचं, बटण दाबता कुणाचं

‘मतदार एवढे हुशार असता की निवडणूक लागले की मतदार सकाळी शिवसेनेचे मटन खातात, दुपारी भाजपची शेवभाजी खातात व रात्री काँग्रेसची जेवण करतात व वरुन सर्वांशी संबंध असल्याचे सांगत कुणाचं मटन खातात आणि कोणाचा बटन दाबतात ते समजत नाही. लोक तर हुशार झाले आहे पण या व्यासपीठावर बसणारे नेतेही उद्या कुणाचा झेंडा हातात घेतील, हेही सांगू शकत नाही ’ असं गुलाबराव पाटील म्हणाले आणि सभेत एकच हश्शा पिकली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -